Home देशविदेश वैचारिक तुलनात्मक लेखमाला केवळ भारतीय जनतेसाठीच…. — आजचा प्रधानमंत्री कर्जबाजारी,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या...

वैचारिक तुलनात्मक लेखमाला केवळ भारतीय जनतेसाठीच…. — आजचा प्रधानमंत्री कर्जबाजारी,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मड्यावरचे लोणी खाणारा….. — तर एक प्रधानमंत्री शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा…..

        1979 ची एक सत्य घटना आहे.” उत्तर प्रदेशातील इटावाजवळ उसराहार पोलीस स्टेशन आहे.सायंकाळचे पाच वाजले असतील.शिफ्ट बदलण्याची वेळ होत आलेली. काही पोलीस कर्मचारी घरी निघण्याच्या बेतात,काही कर्मचारी ड्युटीवर जॉईन होण्याच्या बेतात असताना,पोलीस निरीक्षक बाहेर होते.

       परंतु,पोलीस उपनिरीक्षक आणि जमादार उपस्थित होते. कांही गप्पा मारण्यात दंग होते.अचानक एक साधारण 75 वर्षाचा गरीब शेतकरी,संकटात सापडलेला, अनवाणी,कपडे मळालेले,केस विस्कटलेले,घामाने ओले झालेला,एक निराश झालेला शेतकरी पोलीस स्टेशनच्या आवारात प्रवेश करतो.

     आत प्रवेश केल्यानंतर संबंधितांना हात जोडून नमस्कार करून विचारतो.फौजदार साहेब कुठे आहेत? मला गुन्हा नोंदवायचा आहे.तेंव्हा संबंधीत उपस्थित पोलीस कर्मचारी काय झालं बाबा?

   शेतकरी….

     माझ्याकडे थोडीशी शेती आहे.ती शेती करण्यासाठी माझ्याकडे बैल नव्हते.म्हणून मी माझ्या शेतीतील थोडीशी शेती विकली. आणि या गावात बैल चांगले मिळतात म्हणून चौकशी केली. त्यानुसार एकाशी बोलणे झाले. म्हणून मी ती शेती विकलेले पैसे घेऊन या गावात बैल विकत घेण्यासाठी आलो.

       परंतु ,या गावातील चोराने माझा खिसा मारला.कृपया त्या चोराला पकडून माझे पैसे मिळवून द्या हो साहेब…..

      असे म्हणून तो शेतकरी पोलिसांना गयावया करू लागला.

    पोलीस उपनिरीक्षक…

       बाबा,तुमच्याकडे पैसे होते,याचा काय पुरावा? तुमचे पैसे याच गावात चोराने मारले कशावरून?तुम्हीच दारू पिऊन पैसे उडवले असाल,किंवा नशेत तुम्ही हरवले असाल,घरी जाऊन काय सांगावं म्हणून तुम्ही हा खोटा बहाणा करून आमच्याकडे आला आहात.अशी तक्रार आम्ही घेणार नाही.

     शेतकरी….

     साहेब हा बघा माझा कापलेला खिसा,यातच कांही हजार रुपये होते.माझ्या म्हातारीने याच खिशात एका कपड्यात गाठ मारून ठेवले होते.त्या चोराने कसे मारले अगदी मला समजले सुद्धा नाही. मी हॉटेलात चहा घ्यायला गेल्यावर पैसे देण्यासाठी हात घातला असता,मला हे लक्षात आलं.तेंव्हा मी लगेच इथं आलो साहेब….

        माझ्यावर कृपा करा,उपकार करा,माझी तक्रार लिहून घेऊन लिहून घेऊन त्या चोराला पकडून माझे पैसे मिळवून द्या साहेब,म्हणून तो शेतकरी पुन्हा गयावया करू लागला!

        पोलीस उपनिरीक्षक :- बाबा,असं रडून पडून काहीही होणार नाही.तुम्ही इथं थांबू नका.आम्हाला दुसरी बरीच कामे आहेत.तुम्ही इथून निघुन जा…

       त्यावर निराश होऊन तो शेतकरी बाहेर निघून जातो. बाहेर पोलीस स्टेशनच्याच आवारातील एका झाडाखालच्या ओट्यावर चिंताग्रस्त मुद्रेने बसतो.

        तेवढ्यात फौजदार साहेबांची गाडी येते. ते आत जातात.या म्हाताऱ्या शेतकऱ्याविषयी आतमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांशी चौकशी करतात.

        आणि मग एक शिपाई शेतकऱ्याजवळ येऊन म्हणतो. बाबा तुमची तक्रार घ्यायला साहेब तयार झालेत.परंतु , काही खर्चापाणी करावं लागेल. असं म्हणताच शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.परंतु , खर्चापाणि म्हणताच पुन्हा दुःखी झाला.

       मी अगोदरच लुटलेला आहे. मी काय खर्चापाणि देणार. हो, नाही,हो नाही करत शेवटी 35 रुपयात तक्रार करण्यासाठी लाच देण्याचे शेतकरी कबूल करतो.

         मग त्या शेतकऱ्याला फौजदार साहेब आतमध्ये बोलावतात आणि जमादाराला त्या शेतकऱ्याची तक्रार लिहून घ्यायला स्वतःसमोरच सांगतात.मग जमादार विचारत जातात,शेतकरी सांगत जातो,जमादार लिहीत जातात.संपूर्ण घटनाक्रम लिहून झाल्यानंतर फौजदार विचारतात,बाबा अंगठा मारणार की सही करणार?

      त्यावर शेतकरी पेन द्या म्हणतो.आणि त्या तक्रार अर्जावर सही करतो.सही केल्यानंतर शेतकरी पॅड सुद्धा आपल्याकडे घेतो.फौजदार साहेबाना वाटते की, सही केल्यानंतर हा बाबा पॅड का घेतोय.या विचारात असताना त्यांच्या या प्रश्नाचे उत्तरही त्यांना काही सेकंदातच मिळते.

        शेतकरी आपल्या मळलेल्या सदऱ्याच्या खिशातून एक स्टॅम्प काढतो.आणि जिथे सही केली होती.त्या सहीवर मारतो.आणि तो कागद तो शेतकरी फौंजदार साहेबांकडे देतो.

           फौजदार साहेब तो लिहिलेला तक्रार अर्ज व्यवस्थित दिसत नाही म्हणून डोळ्यावर चष्मा चढवून सुरुवातीपासून वाचण्यास सुरुवात करतात.जसजसे वरून खाली वाचत येतात.तसतसे ते 35 रुपयाच्या कल्पनेने खुश होतात.

      परंतु ,जेंव्हा शेवटी सही आणि शिक्का वाचतात तेंव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली…

     कारण ती सही होती चौधरी चरणसिंग यांची आणि त्यांच्या पदाचा शिक्का होता…..

       प्रधानमंत्री भारत सरकार हे पाहताच संपूर्ण पोलीस स्टेशनमधील अधिकारी कर्मचारी यांचे काही क्षणातच धाबे दणानले!

       अवघ्या अर्ध्या तासात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,सर्वच प्रशासन धावतच त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.थोड्या वेळात प्रधानमंत्री यांचा ताफाही तेथे पोहचला.नंतर प्रधानमंत्री आपला पेहराव बदलून दिल्लीला रवाना झाले.जाताना त्यांनी संपूर्ण पोलीस स्टेशनलाच निलंबित करण्याचा आदेश देऊन जातात.

     माजी प्रधानमंत्री चौधरी चरणसिंग हे प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्या नंतर केवळ 5 महिनेच प्रधानमंत्री पदावर होते.परंतु ,माजी केंद्रीय मंत्री म्हणून सुद्धा काम केले.उ.प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी सेवा केलेली होती.मुख्यमंत्री असताना या भ्रष्ट उसराहार पोलीस स्टेशनच्या अनेक लेखी तक्रारी शेतकऱ्यानी पाठवल्या होत्या.

         जेंव्हा माजी प्रधानमंत्री चौधरी चरणसिंग एका कार्यक्रमाला उपस्थित राहून या गावावरून आपल्या ताफ्याने जात असताना.त्यांना त्या शेतकऱ्यांनी पाठवलेल्या पत्राची आठवण झाली.आणि लागलीच त्यांनी आपल्या ताफ्यातील सहकार्ऱ्याना सांगितलं की,तुम्ही मलाइथे एकटे सोडा.तुम्ही दूर निघून जा दोन तासांनी इशारा समजताच या.मग त्यांनी तिथेच जवळच्याच शेतात जाऊन शेतकऱ्याचे मळलेले कपडे परिधान केले,पायातील वहाण काढून टाकले.केस विस्कटून टाकले.निराश आणि चिंताग्रस्त मुद्रेने उसराहार पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करतात…

       आणि आजचे आमचे प्रधानमंत्री तीसऱ्यांदा प्रधानमंत्री होऊन सुद्धा विजय मल्ल्या, अदानी, अनिल अंबानी,निरव मोदी,ललित मोदी,अशा मोठ मोठ्या उद्योगपतींचे लाखो कोटी रुपये कर्ज माफ करतात……..

      परंतु,काही हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकत नाहीत!

      कारण यांना कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मड्यावरच्या टाळूवरचे लोणी खायचे आहे!

      जे प्रधानमंत्री अवघे 5 महिने असताना शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करतात आणि हा प्रधानमंत्री जळत्या मणिपूरला अजूनही भेट देत नाही…..

       अजूनही पहलगाममधील शहीद 28 जणांची भेट घेऊन अश्रू पुसण्याची त्यांनी तसदी घेतली नाही.ऑपरेशन सिंदूर नंतर अचानक सिजफायर केल्याची घोषणा सुद्धा डोनाल्ड ट्रम्पनी केली!

      शेतकऱ्यांनो आणि सर्वसामान्य भारतीय नागरिकांनो अन्याय सहन किती म्हणून करणार!

   त्यासाठी आजच्या घडीला हे केंद्रातील आणि राज्यातील सरकार ज्या EVM आणि VVPAT च्या बळावर जाऊन तिसऱ्यांदा बसले आहे.त्या EVM ला कायमचे जगातून हद्दपार करूया….. 

    त्यानंतर संविधान जागृती करूया…

      जागृतीचा कृतिशील लेखक..

        अनंत केरबा भवरे

    संविधान विश्लेषक, 7875452689