Home Breaking News ब्रेकिंग न्यूज…  — लांडग्याच्या हल्ल्यात 13 शेळ्या ठार,तर तीन जखमी…

ब्रेकिंग न्यूज…  — लांडग्याच्या हल्ल्यात 13 शेळ्या ठार,तर तीन जखमी…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

      चिमूर तालुकातंर्गत मौजा जवराबोडी येथील शेतशिवारात बसक्यावर असलेल्या शेळ्या व मेंढ्यांच्या कळपावर गुरुवारला पहाटेच्या सुमारास लांडग्याने शेळ्या-मेंढ्याच्या कळपात घुसून 13 शेळ्या ठार केल्या व दोन बकऱ्याला जखमी केल्याने मेंढपाळाचे 80 हजार रुपयाचे नुसकान झाले आहे. 

              जवराबोडी येथील शेतकरी श्रावण काळे यांचे शेतात आंबोली येथील मेंढपाळ हेमराज थाटकर व दशरथ भोगे आणि लावारी येथील सौरभ रंधये यांनी आपल्या स्वतःच्या व राखणीला असलेल्या शेळ्या व मेंढ्या बसविल्या होत्या. 

       या शेळ्या व मेंढ्या बांबू पासून तयार केलेल्या कठऱ्यामध्ये रात्रभर बसविल्या जातात व पहाटेच्या सुमारास त्या कटऱ्याबाहेर काढून बसविल्या जातात.याचा फायदा घेऊन दबा धरून बसलेल्या लांडग्याने या शेळ्या व मेंढ्याच्या कळपा मध्ये घुसून तेरा शेळ्यांना जागीच ठार केले व तीन बकऱ्याला जखमी केले. 

        याची माहिती मेंढपाळांनी वनविभाग शंकरपूरला दिली असता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोका चौकशी करून घटनेचा पंचनामा केला व झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाच्या वन विभागाकडे पाठवण्यात आला. 

        या मेंढपाळांना त्वरित नुकसान भरपाई मिळण्यात यावी,अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.