Home Social नुकसानग्रस्त शेतकऱ्यास आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांचे कडून आर्थिक मदत…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यास आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांचे कडून आर्थिक मदत…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

       चिमूर तालुकातंर्गत मौजा विहीरगांव येथील अशोक गणपत नन्नावरे यांच्या,गावाशेजारील गोठ्यामध्ये बांधून असलेल्या बैल जोडीवर वाघांनी हल्ला केला होता.सध्यास्थित बैलजोडी मरणासन्न स्थितीत आहे.

     आता शेत मशागतीची कामे आली असल्याने सदर शेतकऱ्यांपुढे शेतीच्या मशागतीचे संकट होते.करावे तरी काय या चिंतेने शेतकरी ग्रासले होते.

      या घटनेची माहिती मिळताच भाजप नेते तथा ग्रामपंचायत साताऱ्याचे सरपंच गजानन गुळधे यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडीया यांना काळविताच आमदार महोदययांनी क्षणाचाही विलंब न करता भाजप तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे यांचे मार्गदर्शनात जि.प.मासळ सर्कल प्रमुख प्रवीण गणोरकर,पं.स.प्रमुख तथा सरपंच सातारा गजु गुडधे,कार्यकर्ते रमेश कंचर्लावार यांचे सोबत विहिरगांव येथे आले व अशोक ननावरे यांचेकडे घरपोच आर्थिक मदत पाठविली.

       मदत सुपूर्द करतांना शक्ती केंद्र प्रमुख विकास भोयर,बुथ अध्यक्ष केशव घरत,भाजपा युवा नेते असिफ शेख,विकास गरमडे व गावातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       वनविभागाकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत करण्यात येईल.असा विश्वास शंकर नन्नावरे या शेतकऱ्यास आमदार भांगडिया यांनी दिला.