EVM हटविणे सर्वोच न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या आईची ईच्छा….
“सर्व दुःखाचे मूळ मोहात आहे…..”
– तथागत भगवान बुद्ध…
“अगदी त्याप्रमाणेच आज 2025 च्या काळातील भारतीय लोकशाहीच्या पराभवाचे मूळ EVM सेटिंगमध्ये आहे…..!
भलेही कुणाला वाटत असेल की आता 2024 मध्ये निवडणुका संपल्या, आता 2029 पर्यंत हा EVM विषय संपला. आता त्याची काय गरज….?
खरे आहे. आता त्याची काय आवश्यकता आहे?
परंतु , आज जे महाराष्ट्राला आणि देशाला, सर्वसामान्य जनतेला जे सर्वांगीण दुःख भोगावं लागते ना……
त्या सर्वांचे मूळ EVM मध्ये आहे…..!
ज्यांना असं वाटतं की, हा काही EVM चा घोटाळा नाही. अशा व्यक्तींनी पुढील प्रश्नांची उत्तरे स्वतःच शोधावीत…..
(1) जर 1998 मध्ये केवळ एकाच मताने केंद्रातील 13 दिवसाचे अट्टलबिहारी वाजपेयी सरकार पडले. तेंव्हा त्या एका मताचे महत्व त्यावेळी वाजपेयी यांना किती वाटले असेल….?
आणि याच उदाहरणातून जो प्रश्न निर्माण झालेला आहे की, नांदेडच्या विधानसभा आणि लोकसभा यांची निवडणूक एकत्र झाली. यामध्ये लोकसभेला जेवढे मतदान झाले, तेवढेच मतदान त्या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा मतदान व्हायला हवे होते. परंतु त्यामध्ये एक लाख चाळीस हजार मतदानाचा फरक का यावा…..?
असे तर शक्यच नाही की, एखादा मतदार केवळ विधानसभा निवडणुकीचं मतदान करेल आणि लोकसभेचं करणार नाही. किंवा लोकसभेचे बटण दाबेन आणि विधानसभेचं बटण दाबणार नाही……..!
या प्रश्नाचे उत्तर आत्तापर्यंत निवडणूक आयोगाने दिलेले नाही.उलट याविषयीच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने खारीज केल्या.
याचे उत्तर शोधावे.
(2) गेल्यावर्षी (2024) हरियाणामध्ये निवडणूक झाली. त्या वेळी एकही सभा मोदी – शहा यांनी घेतली नाही. उलट एका भाजप मंत्र्याने एका आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या फोगाट या महिलेचा कसा विनयभंग आणि अन्याय केला हे प्रकरण ताजे असताना….
राज्यात भाजप विरोधी लाट असताना…….
भाजपात स्थानिक नेत्यात कलह असताना……..
उलट काँग्रेसचे त्यांच्या तुलनेने पारडे जड असताना……..
उलट शहाची रॅली अचानक रद्द करून सुद्धा…….
थोडक्यात भाजपविरोधी हरियाणात लाट असताना……..
प्रचारसभेत तत्कालीन आणि आजचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी हे जाहीरसभेत वक्तव्य करतात, ” डरने की कोई बात नही. छत्तीसगड मे जो हुवा, वही हरियाणा मे होगा. सारी व्यवस्थाए हमारे पास है. हमने सारा इंतेजाम करके रखा है. जब आठ आक्टोबर को EVM खुलेगी, तब काँग्रेस रोएगी और कहेगी, की EVM नेही इनको जिताया है…..!”
शेवटी आठ तारखेला तेच झालं……..
पहिल्या एका तासात साडेआठ ते साडेनऊ पर्यंत पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत काँग्रेस 55 जागेवर आघाडी तर भाजप केवळ 25 जागावर आघाडी होती. ती वाढतच होती……..
जेंव्हा EVM उघडल्या तेंव्हा मात्र केवळ अर्ध्या तासात चित्र उलटं झालं…….
शेवटी भाजपला पाशवी बहुमत मिळालंच.
त्याच दिवशी मुंबईत आमचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फसणवीस यांनी भाजप कार्यालयात एकमेकांना मिठाई भरवून जल्लोष केला. आणि सांगितलं की , ” हरियाणा मे जो हुवा वही महाराष्ट्र मे होगा.”
त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूका घोषित झाल्या. विदर्भातील एका सभेत EVM प्रधानमंत्री मोदींनी जाहीर सभेत वक्तव्य केले की, ” हरियाणा मे पहेले कई ज्यादा सीटे हमे हरियाणा जनताने दी है. और महाराष्ट्र की जनता भी हमे पहेलेसे कई ज्यादा सीटे दीलवा रही है. “
आणि झालेही तसेच…….
288 पैकी 232……!!!!”
तरी कुठेही जल्लोष नाही…….
कुठेही गुलाल उधळला गेला नाही…..
कुठेही आनंदाची लाट नाही दिसली……!
महाराष्ट्रीयन जनतेबरोबरच विजयी आणि पराभूत उमेदवारही थक्क……!
एवढेच काय,स्पष्ट पाशवी बहुमत मिळवून सुद्धा सरकार स्थापनेसाठी वीस दिवस घेतले…..!!
अजूनही महाराष्ट्र या धक्क्यातून सावरलेला नाही…….
प्रश्न आमचा हा अजिबात नाही की सरकार कोणाचे येवो. भलेही 288 पैकी 288 जागा कोणत्याही एकाच पक्षाच्या येवो…….
प्रश्न असा आहे की, ज्यांच्या काळात शेतकरी आत्महत्येचे प्रकरणे सर्वात जास्त आहेत……..
ज्यांनी बंडाचे निशाण रोवण्यासाठी अनैतिकतेने आणि नामर्दपणे सुरत, गुवाहाटीचा खोक्यासाठी आधार घेतला………
ज्यांचे बोट धरून राजकारणात चालायला शिकला आणि द्रोणाचार्यप्रमाणे ते बोटच तोडून घेऊन 70 हजार कोटी घशात घातले…….
भ्रष्टाचाराची नीचांक पातळी गाठून छत्रपती शिवाजी राजांनाही यांनी सोडले नाही. वर्षभरात पुतळा पडला……….
चोरून सकाळच्या प्रहरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ काळी टोपिवाला देणारा देतो आणि घेणारा निर्लज्जपणे घेतो………
नालासोपाऱ्यात विनोद तावडेला 9 कोटी रुपये वाटतांना रंगेहात पकडल्या जाते. निवडणुकीनंतर कुठलाही तपास नाही आणि गुन्हाही दाखल होत नाही………
असे असताना सुद्धा……..
महाराष्ट्रात 288 पैकी 232 कशा जागा येऊ शकतात…..?
या दोन प्रश्नांचा आणि शंकांचा विचार स्वतः ज्यांना EVM चुकीचे वाटत नाही त्यांनी करावा…..
आणि आज नेमके हेच देशाच्या आणि राज्याच्या दुःखाचे मूळ म्हणजे EVM हटवीण्याची ईच्छा……..
आदरणीय. कमलाआई गवई यांनी व्यक्त केली…..
आदरणीय आईनी, मी जेंव्हा EVM विरोधात औरंगाबाद येथे आमरण उपोषण केले होते. तेंव्हा त्यांनी या आंदोलनास मला फोन करून पाठिंबा दिला होता……
आता माझे व्हिजन एकच असणार आहे. EVM हटविण्यासाठीच सर्वकाही..
आपले सुद्धा तेच असले पाहिजे……



