Home देशविदेश विवाह कशासाठी? नात्यासाठी की प्रपंचसाठी?

विवाह कशासाठी? नात्यासाठी की प्रपंचसाठी?

     विवाहातून रक्तसंबंध आणि त्यातून नाती निर्माण होतात.विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे नाते संबंध नसून दोन कुटुंब आणि दोन कुटुंबामुळे या दोन कुटुंबाशी संबांधीत इतर जेव्हढी कुटुंब असतील त्यांच्याशी पण नाते जोडणे होय.याचा अर्थ विवाह म्हणजे नात्याचे जाळे निर्माण करणे होय.या जाळ्यातील प्रत्येक कुटुंब आणि नाते एकमेकांची काळजी वाहत असतात.एकमेकांच्या दुःखात आणि सुखाचे प्रसंगी धाऊन येत असतात.विवाहाच्या जाळ्यातील प्रत्येक जण आपल्याशी कुणाचे काय नाते आहे ? हे माहित असते.त्या नात्याची ओळख आणि जाणीव ठेवायची असते.एकमेकांशी संबंध ठेवायचे असते.एकमेकास सहकार्य करायचे असते.यासाठीच ही विवाहाचे जाळे असते.विवाह म्हणजे नात्यांचे बंधन,दुष्ट बंधन नसून पवित्र बंधन होय.नात्यांचा उपयोग एकमेकांना हात देऊन संकटातून बाहेर काढण्यासाठी असतो.पत्नीकडच्या साऱ्या नात्यांची कुटुंबे आणि पलिकडच्या साऱ्या नात्यांची कुटुंबे,असेच आई भाऊ बहीण आजोबा आजी मामा मामी सारे मेहुणे मेहुणी या सर्व नात्यांची कुटुंबे आणि त्या कुटुंबातील प्रत्येक माणसे यांचे एकमेकांशी कोणतेना कोणते नाते निर्माण होते,ते नाते जपायचे असते.यासाठीच तर विवाह हा एक संस्कार सोहळा असतो,म्हणजेच साऱ्याच नातेवाईकांचा तो एक प्रकारचा मेळावाच असतो. गेट टुगेदर च होय.यात हल्ली मित्रांच्या नात्यांचा पण समावेश होत आहे.नातेवाईक आणि सर्व जाती धर्माचे संबंधित लोक एकत्र येणे हे अधिकच चांगले होय.कारण सर्व नातेवाईक तर एकत्र येतातच पण त्याच बरोबर आपल्या व्यवसायातील सहकारी आणि आपल्या जीवनातील मित्र एकत्र येणे म्हणजे एक प्रकारची सामाजिक समरसता,एकता निर्माण करणे होय.सामाजिक सलोखा प्रस्थापित करणे होय.

    विवाहाचा उद्देश जर वरील प्रमाणे असेल तर, तो उद्देश हल्ली साध्य होताना दिसत नाही.सध्याची सामाजिक आर्थिक परिस्थितीमुळे एकत्रित कुटुंबे नाहीशी झाली.कारण नोकरी ,व्यवसाय साठी घरातील कुटुंबातील सारे भाऊ, आई वडील एकत्र रहात नाहीत,वेगवेगळ्या लांब अंतरावर रहावे लागते,शेती व्यवसाय डबघाईला आला,म्हणून खेडेगावातील लोक विविध शहरात स्थलांतरित झाले.वर्षातून एकदा सुद्धा भेटत नाहीत.म्हणून नात्याचे जाळे तुटताना दिसते आहे.परिणामी आई वडील पण मुलांना नकोशी झाली आहेत.कारण एकत्र न राहण्यामुळे आणि शहरातील छोटीशी घरे,अपुरी जागा,महागाई हे पण नाते दूर जाण्याची कारणे आहेत.म्हणून हल्ली माणसाचे विश्व फारच संकुचित झाले आहे,मी बायको दोन मुले,एक घर,मोटर सायकल आणि आपला धंदा नोकरी यातच विवाहबद्ध झालेली नवीन जोडपी अडकली आहेत.कोशातील किड्यांप्रमाणे.अर्थात दोष त्यांचा किंवा कुणाचाही नाही,तर दोष किंवा याचे कारण आहे,भांडवली अर्थव्यवस्था.शोषण करणारी,भरमसाठ नफा कमावणारी , महागाई बेकारी वाढवणारी अर्थव्यवस्था . ही विषमतावादी अर्थव्यवस्था निर्माण करणारे सरकार,आणि निवडून जाणारे राजकारते,कार्यकर्ते,नियोजन करते.

    विवाह हा प्रपंच करण्यासाठी करायचा असतो,म्हणजेच बायको मुले घर नोकरी व्यवसाय यासाठी. म्हण आहे ” प्रपंच करावा नेटका ,कधी नसावा फटका “. याचा अर्थ योग्य नियोजन करणे, अंथरन पाहून पाय पसरणे,सतत प्रयत्नशील असणे, यशस्वी वाटचाल करणे वगैरे.हे सारे उपदेशपूरते ठीक आहे,वस्तुस्थिती मात्र वेगळीच असते,कारण कुणी गरीब तर कुणी मध्यम तर कुणी श्रीमंत हे वर्ग आपोआपच निर्माण होत नसतात.दैव किंवा देव यास कारणीभूत नसतात,तर अधिक श्रीमंती याचा अर्थ अधिक गरीबी,म्हणजेच अधिक पिळवणूक आणि शोषण यामुळे ही वर्गीय आर्थिक समाजरचना निर्माण होत असते.म्हणून किती मुलांना जन्म द्यावा ? घर कसे असावे ? आपले आरोग्य कसे असावे ? मुलांचे शिक्षण कसे असावे ? हे विवाह वरुण ठरत नाही,की प्रपंचावरून.हे सारे ठरते आर्थिक विषमता,वर्गीय अंतर किती असावे ? किती असावे ? हे सरकार ठरवीत असते.म्हणून प्रपंच नेटका किंवा फटका करणे हे त्यांच्याच हातात असते.

      विवाह का करायचा तर नाते संबंध घट्ट करणे साठी,हे नाते टिकण्यासाठी मजबूत करणेसाठी नात्यात प्रेम आपुलकी जिव्हाळा काळजी हवी ती वर्तमान व्यवस्थेत आणि परिस्थितीत निर्माण होत नाही,म्हणून ती दिसत नाही.

      धार्मिक शिक्षण तर असे आहे की,प्रपंच हा संसार खोटा आहे,भासमान आहे,यात काही राम नाही.ही नाती सारी खोटी आहेत, कमाई कितीही केली तरी शेवटी मेल्यानंतर सोबत येणार नाही.मोक्षप्राप्ती हेच जीवनाचे ध्येय्य असले पाहिजे.असे नेहमीच महाराज कीर्तनातून पोथ्यापुरानातून सांगत असतात,सारेच जण माना डूलव तात, तरी प्रपंच करायचे कुणी सोडत नाहीत,याचा अर्थ धार्मिक शिक्षण हे केवळ करमणूक चे साधन बनले आहे,कारण हे शिक्षणच मुळी चुकीचे आणि निराधार आहे.प्रपंच कसा महत्वाचा आहे,यातून नाते कसे निर्माण होतात,परस्पर सहकार्य कसे करायचे ? नाती किती महत्त्वाची आहेत आणि ती कशी टिकवली पाहिजेत.नाती संबंध कशी असावीत ? काही जोडावेत ? ते कसे टिकवावे? हे शिक्षण न देता,कुणाची आई आणि कुणाचा बाप,कोणकुणाचा भाऊ हे सारे स्वार्थी नाते आहेत,आणि हा प्रपंच म्हणजे मायाजाल आहे,खोटा आहे.खरे काय तर ते म्हणजे फक्त ईश्वर .म्हणून संसार सोडा अन् ईश्वराच्या नादी लागा.म्हणजे त्यात तलिन व्हा.असे धर्मगुरू सांगतात.आणि भक्तांच्या कमाईवर हे जगतात.तरी विवाहप्रसंगी त्यांचे आधी दर्शन करूनच विवाह होतात,किती हा विरोधाभास ?

   खरे तर विवाह म्हणजे नात्यांचे बंधन आणि प्रपंचाची जबाबदारी होय,हे बंधन निभावले पाहिजे आणि संसाराचे ओझे पेलले पाहिजे.हा विवाहाचा खरा उद्देश आहे. नाती जोडण्यासाठी विवाह आनी ती मजबूत करण्यासाठी प्रपंच संसार आहे.असा सामाजिक आशय ज्यांना समजला ते कसेतरी सुखी आनंदी दिसतात आणि धार्मिक आशय ज्यांना समजला ते संसारात दुखी आणि परे शान आहेत.हेच वास्तव आहे.

     लेखक : दत्ता तुमवाड.

      सत्यशोधक समाज नांदेड.

दिनांक : 21 मे 2025.फोन : 9420912209.