राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
मौजा कोलूपदीकसा येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित मागणीनुसार नवीन सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते काल संपन्न झाले…
या कामासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून,ग्रामस्थांच्या सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी एक सुसज्ज व उपयोगी मंच उपलब्ध होणार आहे.
यामुळे गावातील नागरिकांना विवाह समारंभ,कार्यक्रम,सभा व विविध सार्वजनिक उपक्रम राबविण्यासाठी स्थायी जागा मिळणार आहे.
यावेळी उपस्थीत काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल,आशिष अग्रवाल,जावेद शेख,वाशिम शेख,जगदीश काटेंगे, दर्याव काटेंगे,अजय गावडे,शिवलाल काटेंगे,गंगाराम हलामी,दलसाय काटेंगे,रामलाल वट्टी, विजय उईके, अलीसाय काटेंगे,फत्तेलाल काटेंगे परशुराम कचलामी,शमसाय काटेंगे,अयारम होळी,मेनोबई नरेटी,सदायबाई गावडे,प्रमिलाबई कुमरे,शिसुलाबई काटेंगे तसेच मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थीत होते.
आमदार रामदास मसराम यांनी आपल्या भाषणात सांगितले की,ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून,गरजेनुसार रस्ते,पाणी,वीज,शिक्षण आणि सार्वजनिक सोयीसुविधांसाठी निधी मिळवून देण्याचे कार्य सातत्याने सुरू राहील.
मौजा कोलीपदिकसा ग्रामस्थांनी आमदार श्री.रामदास मसराम यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि लवकरच हे काम पूर्ण होऊन वापरात यावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.



