शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च – 2025 मध्ये मानवता विद्यालय चिचाळा (शा) ता. चिमूर, जि.चंद्रपूर येथील विद्यार्थांनी भरघोस असे यश संपादित करत मानवता विद्यालयाची चालत आलेली उत्तम निकालाची परंपरा अविरत सुरु ठेवली आहे.
कु.नंदिनी रामलाल रामटेके हिने 78.60 % गुण मिळवत center फर्स्ट चा मान पटकाविला आहे तर संचय शत्रुघ्न रामटेके 75.60 %,आयुष अशोक वाकडे 73.20%,प्रशिक पत्रू रामटेके 73.20 %, कु.प्रणाली दिपराज रामटेके 66.60 % गुण मिळवत प्रावीन्य प्राप्त केलेले आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थाना ज्ञानकुंज विद्याप्रसारक मंडळ चिचाळा (शा) तसेच मानवता विद्यालय चिचाळा (शा) च्या मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाकडून पुढील शैक्षणिक वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



