Home Social नवेगांव (ब्राम्हण) येथे महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती उत्साहात साजरी…

नवेगांव (ब्राम्हण) येथे महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती उत्साहात साजरी…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

    चिमूर तालुकातंर्गत भिसी जवळील 3 किलोमीटर असलेल्या नवेगाव( ब्राम्हण) येथे महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

     यावेळी महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण केले.तद्वतच अभिवादन केले.

      याप्रसंगी रंजना ढोक,जिजाबाई पाटील,वैशाली बौद्ध,शिल्पा पाटील,कैलास बोरकर,गुरुदेव राऊत,प्रकाश बोरकर,प्रदीप पाटील,बाबा बौद्ध,धीरज पाटील,साहिल बोरकर,शुभम पाटील,दीक्षांत श्रीरामे आदी मान्यवर व बौद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते.

      कार्यक्रमाची सांगता खीर दानाने करण्यात आली.