Home Social इंदिरा नगर येथे महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती उत्साहात साजरी…

इंदिरा नगर येथे महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती उत्साहात साजरी…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

       स्थानिक चिमूर येथील इंदिरा नगर येथे धम्मंजली महिला मंडळ यांच्या वतीने आज आज बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय.

     सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती विचार मंच येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमा निमित्ताने आलूभात व खिरदान करण्यात आले.

         जयंती उत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य मार्गदर्शकांनी विशेष मार्गदर्शन केले.

     या कार्यक्रमांतर्गत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्वागत गिताने करण्यात आले.

           ऍडव्होकेट संजीवनी सातारडे,हरी मेश्राम,उपासिका कल्पना गायकवाड हे विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते,तर अध्यक्षस्थानी श्री.संतोष भैसारे हे होते.

      सामाजिक कार्यकर्ता किशोर अंबादे,विलास इंदूरकर तसेच अखिल भारतीय तक्षशिला बौद्ध विहारचे सदस्यगन व शहरातील सर्व बौद्ध उपासक व उपासिका यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

        या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.रसिका अरुण लोखंडे यांनी केले