Home देशविदेश तथागत बुद्ध हे गणराज्य लोकशाही चे प्रणेता होते :- निळकंठ शेंडे..

तथागत बुद्ध हे गणराज्य लोकशाही चे प्रणेता होते :- निळकंठ शेंडे..

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

    रमाई बौद्ध महिला मंडळ समता नगर वडाळा (पैकु) चिमूर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय.

     या कार्यक्रमाच्या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुख्य मार्गदर्शक निलकंठ शेंडे म्हणाले की,तथागत बुद्ध हे गणराज्य लोकशाहीचे प्रणेता होते.

       पुढे बोलताना त्यांनी भ.बुध्दांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग विषद केले.वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला,याचं दिवशी तथागताला बुद्ध ज्ञान प्राप्ती झाली व याचं वैशाख पौर्णिमेला तथागताचे महानिर्वाण सुद्धा झाले.

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बुद्धिष्ट माणसाने दर रविवारी बौद्ध विहारात जाऊन धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे असे ते म्हणाले.

       या कार्यक्रमाचे अध्यक्ष डि.एम.नन्नावरे से.नि. मुख्याध्यापक होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.महेश खानेकर,शिरिष घोनमोडे,प्रा.चंद्रभान खंगार होते.

      त्यांनी सुध्दा मार्गदर्शन करताना तथागत भगवान गौतम बुद्धांच्या सखोल ज्ञानावर विस्तृत भाष्य केले.

    कार्यक्रमाचे संचालन लोखंडे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर पाटील यांनी केले,आभार वावरे सर यांनी मानले.

         महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्धांचा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी रमाई बौद्ध महिला मंडळाच्या महिलांचे विशेष सहकार्य लाभले.