Home Social खासदार डॉ.नामदेवराव किरसान चिमूर तालुक्यातील मौजा सावरी (बिडकर) ला २६ में ला...

खासदार डॉ.नामदेवराव किरसान चिमूर तालुक्यातील मौजा सावरी (बिडकर) ला २६ में ला येणार…. — खासदार महोदयांचा होणार सत्कार!

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी.. 

        चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा सावरी (बिडकर) येथे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांचा सत्कार ग्रामपंचायत पदाधिकारी तथा गाववासियांच्या तर्फे केला जाणार आहे. 

     दिनांक २६ में २०२५ ला होणाऱ्या सत्कार समारोहाला उपस्थित राहण्यासंबंधाचे पत्र सरपंच लोकनाथ रामटेके यांनी प्रत्यक्ष भेटून खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांना दिले आहे.

         भेटी दरम्यान खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांच्या सोबत विविध विषयांवर चर्चा सुध्दा सरपंच लोकनाथ रामटेके यांनी केली आहे.या चर्चा दरम्यान गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी खासदार महोदयांना विनंती केली.

        खासदार डॉ.नामदेवराव किरसान हे कर्तव्यदक्ष,कर्तव्यक्षम,प्रेमळ,सतर्क,जागरुक लोकप्रतिनिधी असल्याने त्यांचा सत्कार मौजा सावरी (बिडकर) येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व गावकऱ्यांच्या द्वारे करण्यात येणार आहे.