1.माणूस का जन्मतो?
2.माणूस का मरतो?
3.माणूस का जगतो?
माणूस कसा जन्मतो ? कसा जगतो? याचे चिंतन या लेखात नाही,तर माणूस का जन्मतो ? का मरतो ? आणि कसा जगतो ? या तीन प्रश्नाचे चिंतन या लेखात मांडले आहे.
माणसाचे जन्मने जगणे मरने याबद्दल धर्मशास्त्र,अध्यात्म शास्त्र, विद्यान शास्त्र आणि बौद्धिक शास्त्र यात याचे उत्तर सापडते.
धर्मशास्त्राप्रमाणे धर्मवादी विचारवंत यांची अशी मान्यता आहे की, पुनर्जन्मावर यांचा विश्वास आहे,पुनर्जन्माचा सिद्धांत हे विचारवंत फॉलो करतात,म्हणजे ते सांगतात,मानतात,याचा प्रचार प्रसार पण करतात,लेख पुस्तक,व्याख्यान,कीर्तन,भजन,मिडिया द्वारे कर्म सिद्धांत चा प्रचार प्रसार करून लोकांची मानसिकता तयार करतात,म्हणून यावर लोक विश्वास ठेवतात.धर्मशास्त्राचा कर्मसिद्धांत असे सांगतो की,माणसाच्या पूर्वीच्या पाप पुण्याच्या कर्मानुसार माणसाचा जन्म मिळतो,84 लक्ष योनीतून जन्म घेतल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो,याचा अर्थ लक्ष चौऱ्यांशीचा फेरा पूर्ण झाल्या शिवाय मनुष्यजन्म मिळत नाही.याचा अर्थ जंतुंच्या सर्व जाती,पशूंच्या सर्व जाती,पक्षांच्या सर्वच जाती,मध्ये जन्म घेऊन तेथील जीवन जगणे पूर्ण करून मरण पत्करले नंतरच माणूस हा मानव जातीच्या पोटी जन्मास येतो.असा हा पूर्जन्माचा सिद्धांत आहे,जो चुकीचा आणि अवैज्ञानिक आहे,तरीपण अधिषिक्षित सुशिक्षित पण हा सिद्धांत मानून जगत असतात.
अध्यात्मशास्त्रात माणूस का जन्मतो ? आणि मारतो ? याचे उत्तर असे मांडले आहे की, देह आणि आत्मा या दोन गोष्टी भिन्न भिन्न आहेत,म्हणजे एक नाहीत,मात्र आत्मा हा देहात च वसतो राहतो,माणसाचा मृत्यू होतो म्हणजे आत्मा हा देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. देह म्हणजे आत्म्याचे वस्त्र होय,तो वस्त्र बदलत असतो.आत्मा म्हणजेच परमात्मा ईश्वर होय.जो प्रत्येक प्राणी मात्र मधे असतो.आत्म्याचे तीन प्रकार 1जीवात्मा 2 शुद्ध आत्मा,3 परमात्मा.देहातील आत्म्यावर विकृतीचे अनेक स्तर असतात,म्हणजे राग लोभ मोह अहंकार द्वेष मत्सर बदल्यांची भावना, पापी नजर ,वासना इत्यादी पडदे आत्म्यावर असतात,माणूस दृढ संकल्प करून ,कठोर परिश्रमाने,जिद्दीने विकृतीचे हे स्तर म्हणजे पडदे दूर करु शकतो,नाहीसे करू शकतो,यासाठी पापाचे खाते खाली करावे लागते आणि पुण्याच्या खात्यातील जमा वाढवावी लागते,याचा अर्थ पाप न करणे आणि आयुष्यभर पुण्याचे काम करीत राहण्याने पापातमा नाहीसा होऊन पुण्यातमा दिसू लागतो,याचाच अर्थ आत्म्यावरील विकृतीचे पडदे स्तर नष्ट झाल्यामुळे आत्मा प्रकाशमान होतो.म्हणजेच माणसाला मोक्ष मिळतो.म्हणजेच माणसाची विकृतीतून सुटका होय.माणसातील सारे दुर्गुण नष्ट होऊन त्याजागी सद्गुण स्थापित होणे म्हणजेच मोक्ष होय.कोणत्याही कारणाने माणूस जेंव्हा मरतो,त्यावेळी त्याच्या पाप आणि पुण्याचा हिशेब होतो,त्या नुसार त्याचा त्या गतीत जन्म होतो,जसे की, पुण्यापेक्षा पाप जास्त झाले तर नरकगती प्राप्त होते,नरकात त्याचा जन्म होतो,याचा अर्थ संडास, शेण, मल मुत्र,कचरा,शिळे अन्न,साठलेले पाणी यात जन्म होतो जंतू म्हणून आल्या किडे माकोडे,सरपटणारे प्राणी म्हणून.अतिपाप ऐवजी कमी पाप झाले तर माणसाला जनावर गतीचा जन्म मिळतो,म्हणजे चारपायच्या पशुचा जन्म मिळतो,आणि माणसाने पाप आणि पुण्य समप्रमाणात केले तर त्यास परत माणूस जन्म मिळतो,असे अध्यात्मशास्त्र सांगते.याचा अर्थ माणसाने ठरवायचे असते की आपण किती पापे करायची ; आणि किती पुण्यकर्म करायचे ,की जेणे करून आपणास नरकगती , जानवर गती,मनुष्यगती आणि देवगती प्राप्त होईल ते ज्याचे त्याचे हाती आहे,कोण काय विचार करतो,कोणता संकल्प करतो,आणि कृती करतो त्यावर हे अवलंबून आहे.
भौतिकशास्त्र विदन्या न शास्त्र असे सांगते की,पंचमहाभूते म्हणजे अग्नी हवा पाणी आकाश माती ( पृथ्वी ) या पंच तत्वाच्या संयोगातून हा देह बनला आहे,या पाच पैकी एकही तत्व नाहीसे झाले की,माणसाचा मृत्यू अटळ आहे,याचा अर्थ माणूस जन्मतो कसा आणि मरतो कसा याची मीमांसा आणि शोध भौतिकशास्त्रात मिळते.जन्म मृत्यूचे कारणही सापडते,आणि हे कारण काल्पनिक नसून वास्तविक आहे,तरी धर्मवादी आणि अध्यात्मवादी विचारवंत मानायला स्वीकारायला तयार नसतात ,का ? याचा शोध घ्यावा लागेल,अनेकांनी घेतला पण आहे.त्याची चर्चा पुन्हा कधीतरी करू,कारण या लेखाचा तो विषय आता तरी नाही,मात्र भौतिक आणि आदि भौतिक शास्त्र माणसाच्या जन्म मृत्यू बद्दल काय सांगते ? याचा उलगडा इथे आपण केला आहे.
चौथे शास्त्र म्हणजे बुद्धी आणि विवेकवादी शास्त्र,या शास्त्रानुसार माणसाच्या जन्म मृत्यू बद्दल ची मांडणी पहिली तर असे निदर्शनास येते की,तुम्ही धर्मशास्त्र,अध्यात्मशास्त्र,भौतिकशास्त्र,काय सांगते ते मानलेच पाहिजे असे नाही,तर जर आपणास बुद्धी आहे,विवेक आहे,तर यांचे सहाय्याने वरील तिन्ही शास्त्रे तपासून पहा,त्यातील सत्य असत्य,योग्य अयोग्य, चूक बरोबर काय ते तुमची स्वतःची बुद्धी वापरून पहा,कोण काय सांगते ? यावर आंधळेपणाने विश्वास न ठेवता त्यावर विचार करा,निरीक्षण परीक्षण तपासणी समीक्षण विवेचन या गोष्टींचा वापर करून प्रत्येक शास्त्र पहा,पडताळून पहा.मगच निर्णय घ्या की,कोणत्या विचारावर शास्त्रावर विश्वास ठेवायचा ,मान्यता द्यायची की नाही द्यायची ? हे ज्याचे त्यांनी ठरवायचे असते,महाराजांनी किंवा एखाद्या विचारवंतानी सांगितले म्हणून तेच खरे न मानता,तुम्हाला तुमची सद्सदबद्दी विवेकबुद्धी प्रामाणिकबुद्धी काय सांगते ? त्यावर तुम्ही विश्वास ठेवा.असे हे बुद्धिशास्त्र सांगते.
वरील धर्मशास्त्र अध्यात्मशास्त्र भौतिकशास्त्र आणि बुद्धी प्रामाण्य शास्त्रअनुसार कुणाची काहीही मांडणी असली तरी मला असे दिसते की,जो माणूस जन्मतो,त्याचे जन्माचा हेतू किंवा प्रयोजन काहीच नसते,केवळ योग म्हणून जन्म मिळाला.त्याचे कारणही नाही,आणि काही कुणाचा हेतूही नाही.सारे अंदाज आहेत.जन्माचे खरे कारण केवळ पंचमहाभूतांचा संयोग आणि v योग आहे,हे मात्र नक्की.मरणाचे कारण पण असेच आहे,नैसर्गिक मृत्यू ,आकस्मिक मृत्यू आणि आत्महत्या हे मरणाचे तीन प्रकार.या तीनप्रकारे माणसाचा मृत्यू होतो याचे कारण धर्म आणि अध्यात्म चुकीचे कारण देते,पण माणसाच्या मृत्यूचे कारण असते,त्याशिवाय विनाकारण माणसाला मृत्यू येतच नाही.उदा.नैसर्गिक मृत्यू येणे म्हणजे वय झाले म्हणून मरण येणे होय,तरी याचे कारण म्हणजे सारे अवयव क्षीण झाल्याने अकार्यक्षम झाल्यामुळेच नैसर्गिक मृत्यू येतो,आकस्मिक मृत्यू म्हणजे अपघाती मृत्यू,उदा.रोडवरील अपघात,पाण्यात अग्नीत पडून फाशी ने मरणे.याचे कारण स्वेच्छेने असेल तर ती आत्महत्या होय,स्वेच्छेने नसेल तर ते आकस्मिक मृत्यू होय,तरी याची करणे असतातच,कारणाशिवाय कोणासही मृत्यू येत नसतो.त्याचे दैव म्हणून किंवा देवास प्रिय झाला म्हणून किंवा त्याचे पापुण्याचा कर्मभोग म्हणून मृत्यू होत नसतो.असे मानणे,अशा गोष्टीवर विश्वास ठेवणे म्हणजे अडाणीपणाचे लक्षण होय.इथे कारणाशिवाय काहीच घडत नाही.कारण जिथे कार्य आहे,त्याला कारण आहे.यालाच ,” कार्यकारण भाव सिद्धांत ” म्हणतात.हा सिद्धांत ज्याला समजला तो शहाणा झाला,असे मानायला हरकत नसावी.
आपण माणसाच्या जन्म मरण चे कारण पाहिले.आता तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधू या.माणसाच्या जगण्याचा हेतू किंवा प्रयोजन काय ? याचे उत्तर असे की,काहीच नाही.कारण जन्माला आलो आणि मरावे वाटत नाही म्हणून जगतो.बाकी काहीच नाही.मग असे जिणे तर कुत्रे मांजर पशु पक्षी किडे पण जगतात,केवळ खाणे पिणे संभोग करणे,झोपणे उठणे हे तर सामान्य किंवा कमीबुद्दीचे प्राणी करतात,असे सामान्य बुध्दीची माणसे पण असे जीवन जगतात.याला काय अर्थ आहे ? माणूस हा बुद्धिमान असल्यामुळे आपल्या बुद्धीचा वापर करून,आपले जीवन सुखकर व्हावे यासाठी अनेक शोध लावणे,आणि आपले जीवन अर्थपूर्ण व्हावे म्हणून स्थळ वेळ काळानुसार नैतिक मूल्य निर्मिती करून जीवन जगले पाहिजे,असे बुद्धिमान विवेकी माणसांनी ठरविले,म्हणूनच स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही सर्वोच्च मानवी मूल्य बुद्धिमान विवेकी माणसाला सापडली,यातच मानवी जीवनाचा पुरुषार्थ आहे,यामुळेच मानवी जीवनाचे सार्थक आहे,यातच सत्य न्याय निती ,अहिंसा ,प्रेम आहे .असे जीवन जगणे म्हणजेच मानवी जीवन जगणे होय.यासाठीच माणूस जगत असतो,नव्हे या मूल्यासाठीच,या मूल्यानुसारच माणसाने जगले पाहिजे,या मूल्यानुसार या विषमतावादी व्यवस्थेत जगणे 100 टक्के तंतोतंत जगणे शक्य नसले तरी या चार मुलांच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न तरी करणे हे मानवी जन्माच्या जगण्याचे दृष्टीने हिताचे आहे.
लेखक : दत्ता तुमवाड..
सत्यशोधक समाज नांदेड.
फोन : 9420912209.



