Home Political युवासेना दर्यापूर शहर प्रमुख पदी रुपेश मोरे यांची नियुक्ती…

युवासेना दर्यापूर शहर प्रमुख पदी रुपेश मोरे यांची नियुक्ती…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक 

           शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि वरूनजी सरदेसाई यांच्या नेतृत्वात युवासेना पश्चिम विदर्भ विभागीय सचिव सागर देशमुख आणि युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी युवासेना दर्यापूर शहर प्रमुख म्हणून रुपेश मोरे यांची नियुक्ती केली.

          रुपेश मोरे यांनी युवासेना दर्यापूर शहर चिटणीस म्हणून काम केले, त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना पदोन्नती देऊन युवासेना दर्यापूर शहर प्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीने दर्यापूर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले व युवासैनिकांमध्ये नवीन जोश तयार झाला.

          यावेळी युवासेना विभागीय सचिव सागर देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, जिल्हाप्रमुख उमेश शहाणे, जिल्हाप्रमुख स्वराज ठाकरे, जिल्हा चिटणीस प्रतिक राऊत उपस्थित होते.