Home देशविदेश महाराष्ट्र राज्यातील भूषण गवई होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश…

महाराष्ट्र राज्यातील भूषण गवई होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

           वृत्त संपादिका 

       महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत.

      ते 52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे 2025 रोजी शपथ घेणार आहेत.

      त्यांना सरन्यायाधीश म्हणून सहा महिन्यांचा काळ मिळणार आहे.ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होतील.

       न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला.

          त्यांचे वडील श्री.रामकृष्ण गवई हे नागपूर येथील जगप्रसिद्ध दिक्षा भुमीचे बरेच वर्ष अध्यक्ष होते,लोकप्रतिनिधी होते आणि बिहार राज्याचे राज्यपाल सुध्दा होते तर आई प्राध्यापीका होत्या.. 

             त्यांचे आईवडील बौद्ध सुसंस्कृतीचे आचरणकर्ता म्हणून जनमानसात रुजलेली आहेत.याचबरोबर त्यांचे बंधू डॉ.राजेंद्र गवई हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव आहेत व जगप्रसिद्ध दिक्षा दिक्षाभुमिचे सरचिटणीस आहेत.

          न्यायमूर्ती भूषण गवई हे सुसंस्कृत घराण्यातील आहेत.त्यांचे मुळ वास्तव महाराष्ट्र राज्यांतर्गत विदर्भातील आहे.विदर्भातील अमरावती शहर हे त्यांच्या आयुष्यातील जडणघडण अंतर्गत महत्वाचे स्थळ आहे.