रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
चिमूर /- स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात क्रिडा व शारिरिक शिक्षण विभागाद्वारे योग व क्रिडा आणि संगणक प्रशिक्षण उन्हाळी शिबिर-2025 आयोजीत करण्यात आले आहे.हे प्रशिक्षण दि.१५ एप्रील ते 30 एप्रील या दरम्यान सप्पंन होणार आहे.
सात वर्षावरील वयोगटातील सर्वांना सहभागी होता येईल.उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सांयकाळी ५ ते ७ वाजता दरम्यान होईल.
शिबिरात जिम्नास्टिक,योग, व्हॉलीबॉल अँथेलटिकस तसेच बेसीक कम्प्युटर ऑफीस ऑटोमेशन अँडव्हान्स,इत्यादी शिकविले जातील.
या प्रशिक्षणाची नोंदणी शुल्क केवळ 600 रुपये आकारण्यात आली आहे.महाविद्यालयात क्रिडा व संगणक प्रशिक्षण उन्हाळी शिबिरामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चितच होईल.
चिमूर तालुक्यातील सर्व विदयार्थ्यानी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.असे आवाहान कार्यकारी प्राचार्य तथा कॅप्टन डॉ.प्रफुल्ल बन्सोड यांनी केले आहे.
उन्हाळी शिबिराचे आयोजक शारिरिक व क्रिडा संचालक डॉ. उदय मेंढूंलकर,(९४२२१२१३६०) प्रा.दुर्योधन रोकडे (८७८८९५९२३८) तथा संगणक प्रशिक्षण समन्वयक प्रा.रुपाली बरडे (८८३०६१४६७८) हे आहेत.
उन्हाळी शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणार्थीनी वरील दिलेल्या भम्रणध्वनी वरती संपर्क साधावा.असे महाविद्यालयातील क्रिडा व संगणक विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.



