Home Political नागपूर जिल्हा शिवसेना (उबाठा) अध्यक्षपदी सुत्तम मस्के (कन्हान)यांची तर पारशिवनी तालुका अध्यक्षपदी...

नागपूर जिल्हा शिवसेना (उबाठा) अध्यक्षपदी सुत्तम मस्के (कन्हान)यांची तर पारशिवनी तालुका अध्यक्षपदी श्री गणेश राजाराम मस्के( टेकाड़ी) यांची नियुक्ती…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी…

पारशिवनी :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर केल्या असून नागपूर जिल्हा अध्यक्षपदी सुत्तम मस्के ( कन्हान) यांची तर पारशिवनी तालुका अध्यक्षपदी श्री.गणेश राजाराम मस्के (टेकाड़ी) यांची नियुक्ती केली आहे.

               जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले सुत्तम मस्के यांच्याकडे उमरेड,रामटेक व कामठी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे. 

     पक्षप्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी गणेश राजाराम मस्के,महाराष्ट्र राज्य संघटक श्री.सागर डबरासे,पक्षनेते श्री.विनायक राऊत,सामाजिक कार्यकर्ते सचिन कापसे यांनी भेट घेतली.

     नागपूर जिल्ह्यात शिवसेना (ऊबाठा) अधिक बळकट करण्याविषयी पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी आर्शिवाद घेत मार्गदर्शन केलं .

     जिल्हा अध्यक्ष सुतम मस्के व पारशिवनी तालुका अध्यक्ष या पदावर दोघांच्या नियुक्तीमुळे शिवसेना (उबाठा) पारशिवनी तालुकाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.