Home Maharashtra कामगार कार्यालयाचा बोगस कारभार… — नोंदणी एकाची, वस्तू दुसऱ्याला.. —...

कामगार कार्यालयाचा बोगस कारभार… — नोंदणी एकाची, वस्तू दुसऱ्याला.. — नोंदीत बांधकाम कामगारांना वस्तू न मिळाल्यास कामगार कार्यालयास टाळे ठोकणार :- आजाद समाज पक्षाचा इशारा… 

ऋषी सहारे 

  संपादक

गडचिरोली :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदीत लाभार्थ्याला गृहपयोगी वस्तूंचा संच वितरित करण्याचे काम सध्या जिल्ह्यात सुरु आहे. परंतु प्रशासकीय यंत्रनेच्या अनियंत्रित व बोगस यंत्रनेमुळे नोंदणीकृत कामगारांना प्रचंड मनस्ताप होत असल्याचा आरोप आजाद समाज पक्षाने केला आहे. 

        आजाद समाज पक्षाचे अध्यक्ष राज बन्सोड यांचेकडे नोंदीत कामगारांच्या तक्रारी आल्या असता त्यांनी गडचिरोली येथील वस्तू संच वितरण ठिकाणास भेट दिली. त्या ठिकाणी संवाद साधले असता अनेक कामगार 2-2 दिवसापासून वस्तू वितरण ठिकाणी येऊन मुक्कामी राहतात आणि कित्येक नोंदीत कामगारांच्या वस्तू त्यांना मिळाल्या नसताना संबंधित ठेकेदार वस्तू उचलली असल्याचे सांगून त्यांना वापस पाठवतोय असे लक्षात आले.

         जेव्हा कि महाराष्ट्र शासन कामगार विभागाचे दि.18 जानेवारी 2021 च्या आदेशातील 11 व्या अटी शर्ती नुसार “गृहपयोगी वस्तू संच वितरित करताना नोंदीत कामगार लाभार्थ्यांचे छायाचित्र काढणे व बायोमॅट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेणे अनिवार्य आहे ” असे असताना लाभार्थ्यांचे वस्तू संच इतरांना कसा जाऊ शकतो? यावेळी राज बन्सोड यांनी संच वितरक ठेकेदाराला याबाबत विचारणा केली असता. आम्ही त्याबाबतीत नाही सांगू शकत, त्यांची फोटो नाही दाखवत पण वस्तू वितरित झाली असल्याचे सांगून उडवाउडवीचे उत्तर मिळाले.

         यांचबरोबर उपस्थित काही कामगारांनी काही संचातील वस्तू सुद्धा कमी असल्याचे सांगितले. सदर प्रकार पाहुण आजाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात धडक देऊन कामगार अधिकाऱ्यांना याचा उत्तर मागितला असता कामगार अधिकारी यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. कामगार अधिकाऱ्यांच्या उत्तरावरून त्यांचे या संपुर्ण प्रकाराकडे बिलकुलच लक्ष नसल्याचा आरोप राज बन्सोड यांनी केला. 

          दोन दिवसात चौकशी करून अन्यायग्रस्त नोंदीत कामगारांना न्याय द्यावा तसेच प्रलंबित नोंदणी, नुतनिकरण प्रक्रिया व लाभाचे प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याची मागणी आजाद समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली. जर नोंदीत कामगारांना त्यांचे वस्तू न मिळाल्यास पक्षाच्या वतीने कामगार कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी पक्षाचे प्रभारी विनोद मडावी, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, नागसेन खोब्रागडे उपस्थित होते.