आर एस एस या सामाजिक संघटनेची राजकीय शाखा म्हणजेच भाजपा पक्ष होय,आर एस एस ही एक धर्मांध आणि हुकुमशाहीचा पुरस्कार करणारी,इतर धर्म जातीना दुय्यम गुलाम करणारी संघटना आहे,हे गोळवलकर गुरुजींची पुस्तके वाचले की समजते.या संघटनेस भारतीय संविधान मान्य नाही,ही संघटना भाजपा म्हणून सत्तेत आल्या पासून अधिकच आक्रमक झालेली दिसते.
चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि मनुस्मृती आपल्या देशाला लागू करण्याचे या संघटनेचे आणि भाजपा पक्षाचे ध्येय उद्दिष्ट्ये आहे,याचाच अर्थ विषमतावादी समाजव्यवस्था स्थापन करण्याचे यांचे अंतिम ध्येय आहे.
याच साठी यांची धडपड स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे आर.एस.एस.स्थापना 1925 पासून चालू आहे,या संघटनेने राजकीय,सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक,औद्योगिक,आरोग्य या सर्व क्षेत्रात आणि महिला युवक विद्यार्थी प्रौढ वृद्ध यांच्यात आणि शेतकरी कामगार व्यापारी या सर्व व्यावसायिक क्षेत्रात सर्व मिळून 150 शाखा कार्यरत आहेत,सर्वच शाखांचे काम रीतसर शिस्तबद्ध ध्येयाने प्रेरित होऊन निष्ठेने शिस्तबद्ध चालले आहे,म्हणूनच ही संघटना काहीच गाजावाजा धांगडधिंगा न करता सत्ता काबीज करण्यात यशस्वी झाली आहे.
आता तर ईव्हीएम मशीनच ताब्यात असल्यामुळे ते बेफिकीर झाले आहेत,मशीन छेड छाड करून त्यांना जेव्हढे आणि ज्या तालुक्यात आणि जिल्ह्यात ज्या माणसाला निवडून आणायचे आहे,त्यास निवडून आणता आहेत.
प्रत्येक निवडणुकीत भाजपचे किती उमेदवार निवडून आणणार हे निवडणूक होण्या आधीच आकडा जाहीर करताहेत,याचा अर्थ एव्हढा यांना आत्मविश्वास आला कुठून ? तर या ईव्हीएम मशीन मुळे.अर्थात निवडणूक आयोगाचा आयुक्त अधिकारी त्यांचाच माणूस असतो,तो यांना या घोटाळ्यात मदत करीत असतो.
भाजपचे विषमतावादी समाज मजबुती हे ध्येय साध्य करण्यासाठी सत्तेत कायम असणे गरजेचे आहे,म्हणून या पक्षाने आपले धोरण,निती स्पष्ट केले आहे.निश्चित केले आहे,ते म्हणजे काहीही झाले तरी आपल्या हाती सापडलेले निवडणूक लढाईचे शस्त्र ते म्हणजे ईव्हीएम मशीन,हे काहीही झाले तरी यास आता सोडायचे नाही,यासाठी जनतेने ,विरोधी पक्षाने कितीही आरडा ओरड केली तरी चालेल,त्यांचा आवाज,मोर्चे कडक कायदे करून दाबून टाकू,पण हे मशीन सोडायचेच नाही.
या शिवाय ईडी चां धाक, बेडी चां धाक,उडी म्हणजे मंत्रिपद एखाद्या महामंडळाचे पदाचे आमिष हे त्यांचे शस्त्र आहेतच,आमदार खासदार विकत घेणे हे पण सोपे काम आहे.
कारण आमदार खासदार जी.प.,प.स.मेंबर यांचा तर दर पाच वर्षाला बाजारच भरतो,निवडणुकीचा घोडेबाजार,यात ज्याला जे आणि जेव्हढे मेंबर आमदार खासदार हवे आहेत,तेव्हढे विकत घेता येतात,अर्थात हे मु के प्राणी नव्हेत तर बोलके प्राणी असल्यामुळे आणि यांचे मालक कुणी नसल्यामुळे हे स्वतःच स्वतःची विक्री किंमत सांगत असतात.हे जगायची गरज नाही.आपणास माहीतच आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी ईव्हीएम आणि सरकार म्हणजे सत्ता स्थापण्यासाठी ईडी, बेडी , उडी आणि जनतेनी निवडून दिलेल्या प्रांतिक सरकारांची फोडाफोडी,हे भाजपचे तंत्र आहे,या बद्दल असंवेदनशील जनतेस याचे काहीच वाटत नाही,हे आपल्या स्वतंत्र देशाचे आणि स्वतंत्र मतदार नागरिक यांचे दुर्दैवच म्हंटले पाहिजे.
पण हे दैवावर अवलंबून जर राहिले तर गुलाम होणार आहेत,गुलामीची व्यवस्था आणणे हे त्यांचे स्वप्न साकार होणार आहे हे या अडाणीना कधी कळणार आहे ? अदानी ले मात्र फारच लवकर समजले .
हे ईव्हीएम मशीन जाऊन बॅलेट पेपर वर इलेक्शन झाले तरच ते पारदर्शक निवडणूक असेल,नाहीतर मतदारांच्या मताची चोरी करणारे हे मशीन लोकशाही नष्ट करून इथे हुकुमशाही आणणार हे नक्कीच.
टीप: हे मशीन हटवण्यासाठी कालच बामशेफ चे वामन मेश्रामजी यांचे नेतृत्वाखाली देशभर जेलभरो आंदोलन झाले,त्यात मी सहभाग नोंदविला.
मला एक दिवसाची कस्टडी झाली.ही माझ्या आयुष्यातील स्वाभिमानाची,निर्भयतेची,देशाचे उज्वल भविष्य पाहण्याची एक अविस्मरणीय आठवण समजतो.ईव्हीएम हटाव,संविधान बचाव,लोकशाही बचाव,देश बचाव,असे आमचे नारे होते.



