Home Social ग्रामपंचायत दुर्गापूर येथे घरकुल लाभार्त्यांची सरपंच परमेश्वर गावडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे...

ग्रामपंचायत दुर्गापूर येथे घरकुल लाभार्त्यांची सरपंच परमेश्वर गावडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन… 

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

     धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ग्रामपंचायत मध्ये सरपंच परमेश्वर गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घरकुल लाभार्त्यांना लवकरात लवकर घराचे बांधकाम पूर्ण करावे अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

      शासनाकडून घरकुल निधी 50 हजार वाढविण्यात आलेला आहे. घराचा बांधकाम योग्य प्रकारे करावे असे सांगितण्यात आले.कोणतिही समस्या आल्यास तात्काळ माहिती द्यावी,आम्ही ग्रामपंचायत माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू असे घरकुल लाभार्थ्यांना सांगण्यात आले. 

       दुर्गापूर ग्रामपंचायत अधिकारी मीनाक्षी डोहे यांची तब्बेत ठीक नसल्याने त्या रजेवर गेल्या आहेत.त्याठिकाणी कामतळा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सय्यद यांनी ग्रामपंचायत दुर्गापूरचा पदभार स्वीकारला.

       यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित सिंधुताई पोटावी उपसरपंच,येसवदाताई टेकाम, मनोजभाऊ टेकाम,नितीन मडावी,ग्रामपंचायत सिपाई महेश बेसरा,मंगलाताई कड्यामी,व सर्व घरकुल लाभार्थी उपस्थित होते.