सिंदेवाही शहरात भुरटे चोर सक्रिय! पोलीस यंत्रणेसमोर आव्हान…

  अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 

सिंदेवाही :- सध्या सिंदेवाही शहरात भुरट्या चोरांनी थैमान घातले असून हे भुरटे चोर रोज रात्री घरफोडी करून घरातील हाताला लागेल ते समान लंपास करीत आहेत. या भुरट्या चोराच्या साध्यस्थित सिंदेवाही शहरात हालचाली वाढल्या असून त्यानी आत्ता स्थानिक पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभे केले आहे.

            या अगोदर सुद्धा सिंदेवाही पोलीस प्रशासनाने या भुरट्या चोरावर कारवाहीचा बडगा उचलला होता. त्यामुळे मधील काळात भुरट्या चोरांच्या हालचाली पूर्ण बंद होत्या. आत्ता हे भुरटे चोर पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी आपल्या चोरी करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. लोहवाही हद्दीतील सिंदेवाही ते पात्री मार्गांवर महेंद्र गेडाम यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. दिनांक 30 डिसेंबरच्या रात्री अंदाजे 2 ते 3 च्या दरम्यान या भुरट्या चोरांनी चोरी करण्याच्या उद्देशाने घराच्या वरील मजल्यावर प्रवेश केला पण घर बांधकाम स्थितीत असल्याने या भुरट्या चोरांच्या हाताला काही लागले नाही. पण भिंतीला लागले इलेक्ट्रिक 19 बोर्ड ज्यांची किंमत जवळपास 35000 रु. किमतीचा मुद्देमाल चोरून नेले आहेत. येण्या जाण्याच्या मुख्य मार्गावरील घरात चोरी करणे म्हणजे पोलीस यंत्रणेलाच आव्हान देणारे आहे.

         या पूर्वी सुद्धा भुरटे चोर सक्रिय झाले होते सिंदेवाही पोलीस प्रशासनाने अश्या भुरट्या चोराच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे शहरात होणाऱ्या चोऱ्यावर अंकुश लागला होता, पण सद्याच्या परिस्थित हे भुरटे चोर शहरात पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत आणि आपल्या चोरीच्या कारवाह्या सुरु केल्या आहेत.संबंधित चोरीचा तपास पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पी.एस.सागर महल्ले, देवानंद सोनुले, अरविंद मेश्राम हे करीत आहेत.