मादा हत्तीचा करंट लागून मृत्यू…

ऋषी सहारे

   संपादक

आरमोरी दि. ३१ – छत्तिसगड राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करीत हत्तीने धुमाकुळ माजवला असुन कुरखेडा तालुक्यातील वाढोना येथील शेतशिवारात करंट लागुन मादा हत्तीचा मृत्यु झाल्याची घटना आज रविवार ३१ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

         छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्हयात प्रवेश केलेल्या रानटी हत्तीने धुमाकुळ माजवला आहे. अशातच हत्तीच्या हल्ल्यात वर्षभरात चार जणांचा बळी गेला आहे तसेच शेतक-यांच्या शेतमालाचे व घरांना नुकसान पोहचविले आहे. आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील महिलेला हत्तीने तुडवुन ठार केल्याची घटना 29 डिसेंबरला रात्रीच्या सुमारास घडली.

             त्यानंतर हत्तीचा कळप हा कुरखेडा तालुक्यात दाखल झाला होता. दरम्यान तालुक्यातील वाढोणा येथे एका हत्तीचा करंट लागुन मृत्यु झाल्याची घटना रविवार 31 डिसेंबर रोजी उघकीस आली आहे. सदर घटनने वनविभागात खळबळ उडाली असुन वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळावरून विद्युत वायरचा बंडल आढळून आला असून शेतात वीजप्रवाह सोडण्यात आला होता त्यामुळे हत्तीचा मृत्यू झाल्याचे कळते. विजेचा प्रवाह सोडणाऱ्यास ताब्यात घेतले असून कारवाई करण्यात येईल अशी माहीती आहे.

         घटनास्थळी नागरिकांचा आक्रोश करंट लागुन हत्तीचा मृत्यु झाल्याची माहिती परिसरात पसरतात नागरिकांनी गर्दी केली होती. तर  हत्तीनी केलेल्या नुकसानीपासून त्रस्त असलेल्या नागरिकांनी परिसरात हत्तीच कळप वावरत असताना वनकर्मचारी भिरकूनही पाहत नसल्याचा आरोप करत वनविभागा प्रती संताप व्यक्त करतांना दिसुन येत होते. नागरिकाचा आक्रोश बघता पोलीसांच्या मदतीने परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली आहे.