मराठा आरक्षणासाठी आळंदीत सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचे राजीनामे… — राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांचा सहभाग…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण साठी आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आळंदी येथील सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण २६ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सुरू केले. या उपोषण स्थळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आळंदी उपशहरप्रमुख शशीराजे जाधव, विभाग प्रमुख संदीप पगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आळंदी शहर महीला शहराध्यक्ष रुपाली पानसरे, राणी रणदिवे, दमयंती कुऱ्हाडे, मंगल कोळी, प्रतिभा घुंडरे, तसेच भाजपचे आळंदी उपाध्यक्ष चारुदत्त प्रसादे, भाजप कार्यकर्ते बालाजी शिंदे, माऊली गलबे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही पक्षाचा पदाचा राजीनामा देत आहे, असे यावेळी सांगितले. यावेळी सकल मराठा समाजाकडून सर्वांचे स्वागत करण्यात आले. 

           मराठा आरक्षणासाठी मनोज रंगे-पाटील यांनी १७ दिवस बेमुदत उपोषण केले. पाटील यांनी ४० दिवसांचा अवधी दिला तरीही राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले नाही. मराठा आरक्षण प्रश्न मार्गी न लागल्याने पुन्हा मनोज जरांगे पाटील हे २५ ऑक्टोबर रोजी पुन्हा आंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहेत या उपोषणाला पाठीबा देण्यासाठी आळंदी येथे २६ ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी साखळी उपोषण सुरू केले.

          या उपोषण स्थळी उबाठा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी भेट देऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला जोपर्यंत मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागत नाही, मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही पक्षाचे काम करणार नसल्याचे यावेळी शशीराजे जाधव यांनी उपस्थित मराठा बांधवांना सांगितले.