Home देशविदेश आमीष दाखवून त्या चार वर्षाच्या चिमूकलीवर अत्याचार करणारा युवक नराधमच! —...

आमीष दाखवून त्या चार वर्षाच्या चिमूकलीवर अत्याचार करणारा युवक नराधमच! — अखेर फरार आरोपीला भिसी पोलिसांनी केले जेरबंद..

 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

       वृत्त संपादिका

           मैत्रींणी सोबत अंगणात खेळत असताना भजीचे आमीष दाखवून साडेचार वर्षीय बालिकेला आपल्या घरी नेले व तिच्यावर अत्याचार केला असल्याची संतापजनक व मानुष्किला काळीमा फासणारी घटना काल चिमूर तालुक्यातील मौजा दाबकाहेट्टी येथे घडली असल्याचे समोर आले आहे.

            आरोपी अमोल गौतम खोब्रागडे वय ३४ वर्ष हा अत्याचारग्रस्त बालिकेच्या घरापासून दूर राहतो आहे.मात्र आरोपीच्या घराशेजारील मैत्रीणीच्या घरी खेळायला अत्याचारग्रस्त बालिका आली होती.घराशेजारी आल्याचा फायदा घेत काल निरागस बालिकेवर आरोपींने जबरी अत्याचार केला.

          अत्याचारा नंतर बालिका असाह्य वेदनांनी विव्हळत व रडत घरी गेली आणि आजीला सर्व घडलेला घटनाक्रम सांगितला.चिमूकलीचे आईवडील शेतावरुन घरी येताच त्यांना अत्याचार घटनेची सर्व माहिती चिमूकलीच्या आजीने दिली.

       वेळ न दवडता मुलीच्या आईवडिलांनी भिसी पोलिस स्टेशन गाठले व अत्याचाराची तक्रार दाखल केली.तक्रार दाखल होताच आरोपींवर अपराध क्रमांक २३३/२३ नुसार भादंवी कलम ३७६,३७६(२)(जे),३७६(एबी),रा.डब्लू ४,८,१२,पेस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.यानंतर चिमूकलीला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले.

       चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक आणि चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद राऊत यांनी सापळा रचून आरोपीला त्याच्या स्वतःच्या घरुन रात्रोला अटक केली.

           आरोपी अमोल गौतम खोब्रागडे याला अटक करताना ठाणेदार प्रमोद राऊत, उपनिरीक्षक सचिन जंगम,जांभुळघाट बिट जमादार अमोल नवघरे व इतर पोलिस सहकारी हजर होते.