अरबिंदो बेलोरा प्रकल्पात स्थानिक युवकांना प्राधान्य द्या.:- मानव अधिकार युवा संघटनेची मागणी…

 

उमेश कांबळे ता प्र भद्रावती 

      अरबिंदो इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बेलोरा येथील कोळसाखान प्रकल्पामध्ये स्थानिक युवकांना नोकरी व इतर कामात प्राधान्य देण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन मानव अधिकार युवा संघटने द्वारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. योगेश वाळके यांचे नेतृत्व कंपनीचे महाप्रबंधक लक्ष्मणराव यांना देण्यात आले.

    अरबिंदो इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हा प्रकल्प बेलोरा, टाकळी व जेना या ठिकाणी होऊ घातला असून या कंपनीद्वारे जाणीवपूर्वक जिल्ह्य व राज्याबाहेरील युवकांना कामे देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. कंपनी सुरू करण्याकरिता लागणारी जमीन ही भद्रावती तालुक्यातील येत असून शेतकरी, शेतमजूर व गावकरी हे पिढ्यान-पिढ्यापासून आपल्या या जमिनीच्या द्वारे उदरनिर्वाहाचे स्तोत्र असलेली जमीन या प्रकल्पाला दिल्या जात आहे. जमिनी प्रकल्पाला दिल्या नंतरही प्रकल्पबाधित बेरोजगार युवकांना डावलल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

      या प्रकल्पात स्थानिकांना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार नोकरीत सामाऊन घेण्यात यावे, तांत्रिक नोकरी असल्यास त्यांना संबंधित विभागाचे तांत्रिक प्रशिक्षण देऊन नोकरीत सामावून घ्यावे. तसे न झाल्यास सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी संघटना रस्त्यावर उतरून भव्य आंदोलन उभारेल. त्यापासून होणाऱ्या नुकसानीस व परिणामास कंपनी प्रशासन जबाबदार राहील. असा इशाराही निवेदनातून देण्यात आलेला आहे.यावेळी मानव अधिकार युवा संघटनेचे सुरज पेंदाम, रुपेश मांढरे, डॉ. रंजित गेडाम हे उपस्थित होते.