अवकाळी पावसाने धान (भात)पिकाचे केलेल्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांना तात्काळ द्यावे… — विधान सभा प्रमुख श्री.विशालजी बरबटे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी सौ.वंदना सौरंगपते यांना निवेदन.

  कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-

        अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या धान पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.सदर भात पिकांचे शासन-प्रशासन स्तरावरुन तात्काळ पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासंबंधाने शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री श्री.उद्धवराव ठाकरे यांच्या सूचने नुसार रामटेक विधान सभा प्रमुख श्री.विशालजी बरबटे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी सौ.वंदना सौरंगपते यांना काल निवेदन देण्यात आले.

          विदर्भासह रामटेक विधानसभा क्षेत्रात गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या धान (भात)पिकाचे केलेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा म्हणून माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे सक्रीय झाले आहेत.

          त्यांनी धान पिक उत्पादन शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची दखल घेत पक्ष पदाधिकाऱ्यांना सुचना देत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या सूचना दिल्यात.याचाच एक कर्तव्य भाग म्हणून उपविभागीय अधिकारी सौ.वंदना सौरंगपते मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

         या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची त्वरित पाहणी करून शासनातर्फे 50 हजार रुपये एकरी मदत देण्यात यावी,शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे विद्युत बिल माफ करण्यात यावे,पेंच प्रकल्पातील पाणीपट्टी सारा माफ करण्यात यावे तसेच पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात यावी इत्यादी मागण्यांसह निवेदन देण्यात आले. 

           याप्रसंगी शिवसेना(उ. बा. ठा.)पक्षाचे जिल्हा युवा सेनाचे लोकेश बावनकर,विधानसभा संगठक विवेक तादुळकर,तालुका प्रमुख कैलाश खंडार,तालुका संगठक गणेश मस्के व जिल्हा परिषद संगठक प्रशांत लकडकर,पंचायत समिती स्तरावरील आणि महीला तालुका प्रमुख व महिला कार्यकता सह संपूर्ण पदाधिकारी व शेतकरी बांधव निवेदन देताना मोठ्या संख्येने उपस्थित होते.