४ ला गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप करणार- ब्राम्हणवाडे…

 

पंकज चहांदे

दखल न्यूज भारत

 

देसाईगंज – काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचा वाढदिवस ५ जुनला साजरा होत असल्याने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या ४ जुनला देसाईगंज येथे गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप करणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी देसाईगंज येथे पत्रकार परिषदेत दिली.

     देसाईगंज येथे तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाध्यक्ष ब्राम्हणवाडे यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एकदिवसा अगोदर म्हणजेच ४ जुन २०२३ ला स्थानिक गजानन महाराज मंदिर माता वार्ड देसाईगंज येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने निराधार महिलांना सिलाई मशीनचे वाटप, स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी करीता विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटपकार्यक्रमाला स्वतः प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीकरीता मार्गदर्शन वर्धाचे संचालक नितेश कराळे यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच कार्यक्रमाला माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके हे व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

     कार्यक्रमाला स्वतः प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीकरीता मार्गदर्शन करण्याकरिता फिनिक्स अकॅडमी वर्धाचे संचालक नितेश कराळे यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच कार्यक्रमाला माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके हे विशेष अतिथी म्हणून येणार आहे तर विधान परिषदेचे आ. सुधाकर अडबाले यांचा सुद्धा यादरम्यान सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिली. 

     पत्रकार परिषदेला माजी आ. आनंदराव गेडाम, जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. नितीन कोडवते, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, माजी नगरसेवक गणेश फाफट, तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, शहरध्यक्ष आरीफ खानानी, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नितीन राऊत, संजय करंकर, माजी तालुका अध्यक्ष परसराम टिकले, जिल्हा सरचिटणीस नरेंद्र गजपुरे, आरमोरी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, अनु. जाती सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज चहांदे, शहरध्यक्ष विक्की डांगे, यूकाँ. तालुका उपाध्यक्ष अमर भर्रे, शहर उपाध्यक्ष विजय पिल्लेवान, तालुका काँग्रेस कमिटी महिला अध्यक्ष आरती लहरी, उपाध्यक्षा विमल मेश्राम, आदिवासी काँग्रेस तालुकाध्यक्षा जयमाला पेंदाम, माजी उपाध्यक्ष निलोफर शेख, रुपलता बोदेले, रजनी आत्राम, कमलेश बारस्कर, विलास बनसोड, पिंकू बावणे, महेंद्र खरकाटे, मनोहर निमजे, हेमराज खेकारे, सचिन झिलपे, राजकुमार मेश्राम, चेतन मेंढे, ओमकार कामथे, बंडू म्हैसकर, सर्वेश्वर मेश्राम, भुमेश्र्वर सिंगाडे, हरिदास बगमारे सहभागी होते.