खासदार बाळू धानोरकरांचा श्वास झाला कायमचा बंद… — उद्या वरोरा येथील मोक्षधाम येथे होणार अंतीम संस्कार…

दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका

       खासदार बाळू उर्फ सुरेश नारायण धानोरकर यांचा उपचारा दरम्यान मंगळवारी पहाटेला दिल्ली येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.मृत्यू समयी त्यांचे वय केवळ ४८ वर्षांचे होते.

           त्यांना साधूपिंड,किडनी स्टोन व इतर आजाराने ग्रस्त केले होते.

         शिवसैनिक,शिवसेना शाखा पदाधिकारी,शिवसेना भद्रावती तालुका प्रमुख,शिवसेना जिल्हा प्रमुख ते शिवसेना पक्षातंर्गत आमदार असा त्यांचा सामाजिक व राजकीय प्रवास २०१९ पर्यंतचा होता.

        त्यानंतर त्यांनी सन २०१९ ला काॅंग्रेस पक्षात प्रवेश करीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली व सुदैवाने निवडून सुद्धा आले व खासदार झाले.महाराष्ट्र राज्यातील काॅंग्रेस पक्षाचे ते एकमेव खासदार होते.

          त्यांचा मृत्यूदेह दिल्ली वरुन हवाई मार्गाने नागपूरला व तिथून वरोरा येथे त्यांच्या निवासस्थानी आणणार आहेत.

           आज ३ ते ४ वाजता पासून उद्या सकाळी १० वाजता पर्यंत त्यांच्या मृत्यूदेहाचे दर्शन आप्तपरिवार,मित्रपरिवार,सामाजिक – राजकीय पदाधिकारी,नेतागण,यांना घेता येणार आहे.तदनंतर वरोरा – वणी बायपास मोक्षधाम येथे त्यांचा अंतिम संस्कार होणार आहे.

         त्यांच्या पत्नी सौ.प्रतीभा सुरेश धानोरकर ह्या आमदार असून महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य आहेत.वरोरा-भद्रावती विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत त्या निवडून आलेल्या आहेत.