गतिमंद विद्यार्थी खेळणार विशेष ऑलिम्पिक खेळ….. — गडचिरोली जिल्हाचे दोन खेळाडू नागपूरसाठी रवाना…

 प्रेम गावंडे

  उपसंपादक

दखल न्युज भारत

         170 पेक्षा जास्त देशांमध्ये बौद्धिकदृष्ट्या आव्हान असलेल्या खेळांना प्रोत्साहन देणारे विशेष ऑलिम्पिक भारत-महाराष्ट्र राज्यस्तरीय लेव्हलमधे खेळण्याकरिता देसाईगंज तालुक्यातील पार्वती निवासी गतिमंद विद्यालयातील दोन विद्यार्थी गडचिरोली जिल्हाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नागपूर येथे 29 जानेवारी रोजी सहभागी झालेले आहेत. पुढील तीन दिवस स्पर्धा होणार असून त्याकरिता विद्यार्थ्यांनी जोरदार सराव केला असल्याची माहिती शारीरिक शिक्षक तसेच एसओबी गडचिरोली जिल्हाध्यक्ष सतीश मडावी यांनी दिली आहे.

            स्पेशल ऑलिम्पिक भारत-महाराष्ट्राला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने बौद्धिकदृष्ट्या अपंगांसाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून मान्यता दिली आहे. आरटीएम नागपूर विद्यापीठ मैदानावर 30, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या एसओबी महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिप ट्रायल आणि कोचिंग कॅम्प नागपूर या कार्यक्रमासाठी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील पार्वती निवासी मतिमंद विद्यालयाचे दोन विद्यार्थी रोहित निलेश ठेंगरी व तेजल सुधाकर तुलावी सहभागी होणार आहेत. त्यांची सर्वच स्तरावरून प्रशंसा होत आहे.