खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील थिगळे यांची निवड…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

         आळंदी : खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी Tv9 मराठीचे प्रतिनिधी सुनिल थिगळे यांची तर सचिवपदी किरण खुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खेड तालुका पत्रकार संघाची वार्षिक सभा खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे मावळते अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर होते.

                   या सभेत पुढील वर्षासाठी अध्यक्षपदी सुनिल थिगळे यांची बिनविरोध तर सचिवपदी किरण खुडे यांची फेरनिवड करण्यात आली. सुनील थिगळे यांना सर्वानुमते कार्यकारिणी निवडीचे अधिकार देण्यात आले. त्यानुसार नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष – सुनिल थिगळे, कार्याध्यक्ष – रोहीदास होले, उपाध्यक्ष – आदेश भोजणे, अतुल भालेराव, सचिव – किरण खुडे, सहसचिव – किशोर गिलबिले, खजिनदार – नाजिम ईनामदार, पत्रकार परिषद समन्वयक – रोहीदास गाडगे, कायदेशीर सल्लागार – ॲड. निलेश आंधळे, प्रसिद्धी प्रमुख – सदाशिव आमराळे, सल्लागार – विद्याधर साळवे, दत्ता भालेराव, राजेंद्र लोथे, महेंद्र शिंदें , बाळासाहेब सांडभोर, रामचंद्र सोनवणे, कार्यकारीणी सदस्य – वनिता कोरे, अशोक कडलक, निवृत्ती नाईकरे, इसाक मुलानी यांची निवड करण्यात आली.

             तालुक्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या संघाचे अध्यक्षपद मला सर्व सहकाऱ्यांनी सोपवले त्याबद्दल मी आभारी आहे. भावी काळात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, पत्रकारांसाठी कार्यशाळा, आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबविणार असून तालुक्यात स्पर्धा परीक्षा बाबत जनजागृती करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील थिगळे यांनी बोलताना सांगितले.

              शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, देवेंद्र बुट्टे पा. हिरामण सातकर, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील थिगळे व पदाधिकारी यांचा सन्मान केला.