जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस शिक्षा..

   कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

कन्हान : – सिहोरा येथील १५ वर्षिय अल्पवयीन पीडिता घरी एकटी असल्याचा फायदा घेत चूलत काकाने तिला वेळोवेळी धमकी दिली व जबरदस्तीने शारिरीक संभोग करून गरोदर केल्याच्या पकरणात अतिरीक्त जिल्हा न्यायाधीशानी आरोपीस वीस वर्ष सश्रम कारावास व दोन, दोन हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 

            अल्पवयीन १५ वर्षीय पिडीतेच्या तक्रारीवरुन पो.स्टे. कन्हान येथे अप. क्र.५७/२०२० कलम ३७६ (२), (एफ), (एन), ३७६ (३), ५०४, ५०६, ४५१ भादंवि. सहकलम ३, ४, ५ (जे), (२), (एल), ६ कायद्यान्वये गुन्हा नोंद होता. 

      यातील आरोपी अतुल वामन मेश्राम,वय २२ वर्ष, रा. सिहोरा, ता.पारशिवनी हा फिर्यादी पिडीतेचा चुलत काका असून पिडीता ही घरी एकटी असल्याचा फायदा घेवुन तिचेवर जबरदस्तीने तिला वेळोवेळी धमकी देवुन शारिरीक संभोग करित होता.

       पिडीतेचे पोट दुखु लागल्याने पिडीतेच्या आईसोबत दवाखाण्यात गेली असता डॉक्टरांनी गरोदर असल्याचे सांगीतले. 

         सदर प्रकरणाचे तपास सपोनि नंदा पाटील यांनी करून प्रकरण न्याय प्रविष्ठाकरिता अतिरीक्त जिल्हा न्यायाधिश श्री. जैस्वाल यांचे कोर्टात सादर केले.

         मंगळवार (दि.३०) जानेवारीला अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश श्री.जैस्वाल यांनी वरील नमुद आरोपीला कलम ४ पोक्सो मध्ये २० वर्ष सश्रम कारावास व २००० रू. दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास व कलम ६ पोक्सो मध्ये २० वर्ष सश्रम कारावास व २००० रू. दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास. 

       कलम ४५१ भादं वि मध्ये ०१ वर्ष साधा कारावास व १०० रू. दंड. दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. 

         सरकारचे वतीने एपीपी खापर्डे मॅडम यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन पोशि ईश्वर हुड यांनी मदत केली आहे.