महापुरुषांना अभिवादन व प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. — कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन..

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

कन्हान : – कन्हान शहर विकास मंच द्वारे ७५ व्या प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले होते. 

       कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे,ताराचंद निंबाळठर यांचा हस्ते महात्मा गांधी,लाला बहादुर शास्त्री,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले,शहिद भगत सिंह यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. 

      यावेळी शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर,प्रदीप बावणे,संजय तिवसकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

       राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता करीत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला.

      या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर,मार्गदर्शक प्रभाकर रुंघे,ताराचंद निंबाळकर,प्रदीप बावने,भुषण खंते,संजय तिवसकर,हरीओम प्रकाश नारायण,प्रकाश कुर्वे,अनुराग महल्ले,कुणाल राजपूत,सुजल यादव,अमन यादव,ओम यादव,शाहरुख खान,सचिन यादव,नितिन मेश्राम सह आदि मंच सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.