भव्य रक्तदान शिबिर व प्रजासत्ताक दिन साजरा..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

कन्हान : – २६ जानेवारी गणराज्य दिना निमित्य मानव अधिकार संरक्षण संघटना द्वारे भव्य रक्तदान शिबिरातंर्गत डागा स्मृती शासकिय रूग्णालय नागपुर रक्त पेढीच्या सहकार्याने युवकांनी रक्तदान करून ७५ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला.  

           आपल्या रक्तदानाने एखाद्या गरजुला जिवनदान मिळु शकते.म्हणुनच “रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ” हे सार्थक करण्याच्या उद्देशाने मानव अधिकार सरक्षण संघटना पारशिवनी तालुका व्दारे शुक्रवार (दि.२६) जानेवारी २०२४ ला सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत गहुहिवरा रस्ता जोड तारसा रोड कन्हान येथे अरविंद बांबोर्डे यांचे अध्यक्षेत व न.प.उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी,वैद्यकिय अधिकारी डॉ. वैशाली हिंगे,वेकोलि उपप्रबंधक विनोद कोचे,सचिन गौरखडे,चंद्रशेखर भिमटे,सुत्तम मस्के आदिच्या प्रमुख उपस्थितीत युवकांनी स्वयंफुर्त रक्तदान केले.

       रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन मानव अधिकार सरक्षण संघटना पारशिवनी तालुकाध्यक्ष श्री.पंकज रामटेके व सदस्यगण यांनी केले होते.

           रक्तदान शिबिराचे यशस्विते करिता मानव अधिकार संरक्षण संघटना पारशिवनी तालुका,प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान,स्कुल व्हॅन चालक मालक संघटन,शिवबा राजे कॅरियर ॲकेडेमी,मानव विकास सेवा बहुदेशिय संस्था मांगली नागपुर,सुत्तम फिटनेस फॅक्ट्री,जय संघर्ष वाहन चालक संघटना,राष्ट्रहित आटो युनियन कन्हान- कामठी आदीचे विशेष सहकार्य केले आहे.