अमळनेर येथील 18 वे विद्रोही साहित्य संमेलनासाठी प्रचार फेरी संपन्न..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

           वृत्त संपादीका 

जळगाव – येथील रामेश्वर कॉलनी व एम.जे.कॉलेज परिसरात अमळनेर येथे होणाऱ्या 18 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या प्रचारा साठी विद्रोही साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वात प्रचार फेरी काढण्यात आली.

       या प्रचार फेरीत विद्रोही साहित्य संमेलन जिंदाबाद,”फुले,शाहू ,आंबेडकरचा विजय असो,”शोषित वंचिताचा आवाज बुलंद करा,”साहित्य संमेलन यशस्वी करा,अशाप्रकारे जोरदार घोषणा देण्यात आल्या.

        या प्रचार फेरीत समाधान सोनवणे,संजय बागुल,पंकज सोनवणे,वाल्मिक सपकाळे,प्रा. ईश्वर वाघ,अविनाश तायडे,प्रा. प्रीतीलाल पवार,डॉ.मिलिंद बागुल,पानपाटील सर,सत्यजित बिऱ्हाडे,अजित भालेराव,भारत सोनवणे,किरण सोनवणे,पंडित बाबा सपकाळे,युवराज सुरवाडे,चंद्रमणी सोनवणे,सुकदेव तायडे,दिलीप सपकाळे,दिलीप त्रंबक सपकाळे,दिलीप अहिरे,महेंद्र केदारे,भाऊराव इंगळे,राहुल मोरे,जयपाल धुरंधर, इत्यादीसह असंख्य कार्यकर्ते उपस्तित होते.