जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या आरोपींना केले गजाआड.. — स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..  — बारा लाख रूपयाचा मुद्देमाल केला जप्त. 

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

कन्हान : – स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कन्हान पोस्टे अंतर्गत बोरडा टोल नाक्याजवळ नाका बंदी करून आयसर ट्रकने जनावरांची अवैधरित्या वाहतुक करताना रंगेहाथ पकडले व बारा लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोलिसाच्या स्वाधिन केले.  

           सोमवार (दि.२९) जानेवारी २०२४ ला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोस्टे कन्हान हद्दीत पेट्रोलींग करित असताना गुप्त माहिती मिळाली की,नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गा वरील बोरडा टोल नाका येथे काही इसम विना परवाना व अवैधरित्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करित आहेत. 

       अशा गुप्त माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटना स्थळी नाकाबंदी करून आयशर ट्रक क्र. एम.एच. ४८ सी क्यु- ५८०८ हे संशयीत वाहन मिळुन आल्याने त्या वाहना जवळ जावुन त्याची पाहणी केली.

      वाहनात आरोपी १) शिवसागर जगन्नाथ मिश्रा वय ४१ वर्ष,रा. नालासोपारा ईस्ट पालघर मुंबई, २) रामभरोसे रमेश यादव वय ३३ वर्ष रा. मुसा खांड चकिया उत्तर प्रदेश यांनी गौवंश जनावरांना अत्यंत कुर व निर्दयतेने वाहनात डांबुन आखुड दोरीने पाय व तोंड बांधुन चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीत अपुऱ्या जागेत कोंबुन कत्तलीसाठी अवैध्यरित्या घेवून जातांना मिळुन आल्याने त्याच्या ताब्यातुन १० गोवंश,प्रत्येक गोवंश किंमत २०,००० रुपये प्रमाणे एकुण २,००,००० रुपये , २) आयशर ट्रक किंमत १०,००,००० रुपये असा एकुण १२,००,००० (बारा लाख) रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

       १० गोवंश गो शाळेत जमा करून ट्रकचे चालक व मालक यांचे विरुद्ध कलम ११ (१) (ड) प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम ५ (१) (२) ९ प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये कार्यवाही करण्यात आली. 

       जप्त मुद्देमाल व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रिये करिता पोलीस स्टेशन कन्हान यांचे ताब्यात देवुन आरोपीं विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण श्री.हर्ष पोद्दार,तसेच अपर पोलीस अधिक्षक डॉ.संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक श्री.ओमप्रकाश कोकाटे,पोलीस उपनिरीक्षक बटुलाल पांडे,सहायक फौजदार नाना राउत,पोलीस हवालदार विनोद काळे,इकबाल शेख,संजु बरोदिया,चालक पोलीस हवालदार मोनु शुक्ला,पोलीस अंमलदार निलेश इंगुलकर यांनी याशस्विरित्या पार पाडली.