खासदार भावनाताई गवळी यांना बीएसएनएल यवतमाळ ची सदिच्छा भेट…!

        शेखर इसापूरे

  विभागीय प्रतिनिधी, नागपूर

       दखल न्यूज, भारत 

यवतमाळ:- दिनांक 29 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे खासदार भावनाताई गवळी वाशिम यवतमाळ मतदारसंघ यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना बीएसएनएल यवतमाळ तर्फे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

             याप्रसंगी यवतमाळ जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय सुदामजी भुमरकर यांनी टेलिकॉम ॲडव्हायझरी कमिटी यवतमाळ जिल्हा चे अध्यक्ष झाल्याचे पत्र आदरणीय भावनाताईंना देण्यात आले. सहाय्यक महाप्रबंधक गजानन सूर्यवंशी यांनी माननीय खासदाराकडून आलेल्या संपूर्ण गावाच्या नावाचा समावेश फोरजी सचुरेशन प्रोजेक्ट मध्ये करण्यात आला आहे, व संपूर्ण फोर जी सच्युरेशन प्रोजेक्ट बद्दल, प्रोजेक्टच्या प्रगतीबद्दल आदरणीय खासदारांना माहिती दिली.

          टेलिकॉम ॲडव्हायझरी कमिटीची बैठक घेण्यासाठी बीएसएनएल यवतमाळ तर्फे विनंती करण्यात आली. आपण सर्वजण बीएसएनएलचे कार्य , न सांगता उत्कृष्टपणे करत आहे त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व सर्व टीमचे अभिनंदनही केले.

         लवकरच टेलिकॉम ॲडव्हायझरी कमिटीची बैठक घेऊया असे आश्वासन त्यांनी दिले.

           याप्रसंगी सहाय्यक महाप्रबंधक लोचन केवटे व उपविभागीय अभियंता नरेंद्र गद्रे आवर्जून उपस्थित होते.