नगराध्यक्षच्या शिष्टमंडळाने घेतली वैद्यकिय अधिक्षक यांची भेट,आरोग्य सेवेवर केली चर्चा…

     राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

             नुकतेच नगराध्यक्ष अनिताताई बोरकर यांचे नेतृत्वात नगर सेविका व महिला पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने वैद्यकियअधिक्षक डॉ अमित ठमके यांची भेट महिला रुग्णाना उपलब्ध सुविधांचा उपजिल्हा रुग्णालयात होणार्या गैर सोयी बाबत चर्चा करून त्वरीत सेवा सुरळीत करण्या बाबत सुचवले. 

मागिल काही दिवसा पुर्वी नगरसेविकेचा गरोदर सुनेला प्रसूती दरम्यान झालेल्या असुविधेमुळे मानसिक,शारिरीक आर्थीक त्रासाला समोर जावे लागले.प्रसूती वेळेस रेफेर टू गडचिरोली करण्यात आले,जर वेळेवर महिला व प्रसूती रोग तज्ञ हजर राहिले असते तर ही परिस्थिती उदभवली नसती., त्याच वेळेवर दुसरी महिला रूग्ण ही रेफेर झाली. ही बाब नगराध्यक्षानी अधिक्षक यांच्या लक्षात आणुन दीली.

          येत्या काळात महिला व प्रसूती रोग तज्ञ ,बाल रोग तज्ञ,भिषक तज्ञ, सुंघनी तज्ञ च्या सेवा सुरळीत कराव्या अन्यथा उप जिल्हा रुग्णालयाला ताळा ठोकन्यात येईल असा इशारा अनिता ताई बोरकर,नगरसेविका जयश्री रासेकर,हेमलता नंदेश्वर,विश्वकर्मा बचत गटाच्या अश्विनी पिंपळकर,शारदा गाथाडे यांनी दिला.