Home Political क्रांतीभूमीत जनतेच्या आशीर्वादाने लवकरच परिवर्तनाची नांदी :- माजीमंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार…...

क्रांतीभूमीत जनतेच्या आशीर्वादाने लवकरच परिवर्तनाची नांदी :- माजीमंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार… — चिमूर नगर परिषद निवडणुक अंतर्गत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

         चिमूर येथे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सारिका नंदेश्वर व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केले.

           देशाच्या इतिहासात चिमुरला क्रांतीची भूमी म्हणून ओळखल्या जाते.आता देशावर धर्मांध शक्तीने सत्ता मिळविली आहे.बहुजनांना गुलाम करण्याचे कट रचले जात आहे.अशातच पुन्हा एकदा लोकशाही व संविधानिक अधिकाराला वाचविण्यासाठी नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसला विजयी करून सुरुवात करावी असे आवाहन विजयभाऊ यांनी चिमूर नगरपरिषद अंतर्गत मतदारांना केले.

           चिमूरच्या या पावन क्रांतीभूमीत भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी ठेकेदारीतून भ्रष्टाचार करून संपूर्ण शहराच्या विकासाला खीळ लावली.त्यांचे कार्यकर्ते सामान्यांच्या समस्यांना बगल देऊन वाळू तस्करी व इतर मलाईदार कामात गुंतल्याचे सर्वत्र दिसून येते.निवडणूक येताच पाकिटे वाटून मतदारांना प्रलोभन,दमदाटी करणे असा प्रकार समोर येत आहे.

              दिल्ली ते गल्लीची सत्ता असताना सुद्धा चिमूर शहराचा तिळमात्रही विकास झाला नाही.महागाई व बेरोजगारी यामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे अवघड झाले आहे.श्रावण बाळ,संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाही.अशा जनविरोधी,मनुवादी विचारांच्या,भ्रष्ट सरकारला धडा शिकविण्यासाठी,बहुजनांच्या न्याय हक्कासाठी आपण काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून देऊन आपल्या शहराच्या विकासाला नवी दिशा द्यावी असे आवाहन सुध्दा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केले.

          बहुजनांच्या न्याय हक्कासाठी,आपल्या देशाची पवित्र लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसच्या लढ्यात सहभागी व्हा,असे आवाहन पदवीधर शिक्षक आमदार अभिजित वंजारी यांनी मार्गदर्शन पर भाषणातून केले.

             या प्रचार सभेस आ.अभिजीत वंजारी,प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस,धनराज मुंगले,प्रा.राम राऊत,गजानन बुटके,विजय गावंडे,संजय घुटके, माधव बिरजे,विवेक कापसे,अविनाश अगडे,राजेंद्र लोणारे,जुनेद खान,मनीष नंदेश्वर,डॉ.रहमान पठाण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सारिका नंदेश्वर,काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार,तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.