Home Political सत्तेचा माज चढलेल्यांना सत्तेत येऊ देऊ नका:- माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ...

सत्तेचा माज चढलेल्यांना सत्तेत येऊ देऊ नका:- माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार  — भिसी येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ जबरदस्त रोड शो! — स्थानिक आमदार विकासाच्या थापा मारणारे :- आमदार अभिजित वंजारी…

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी..

          चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा भिसी येथे नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रोडशो करण्यात आला व भव्य रोड शो नंतर जाहीर सभा घेण्यात आली.

           नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आकाश पाटील आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना भरभरून मते देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व आमदार अभिजित वंजारी यांनी सभेला संबोधित करताना भिसी येथील मतदारांना केले आहे.

              देशात धर्मांधतेचे विष कालवून सत्ता प्राप्त करणाऱ्या भाजप सरकार काळात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात,महिला व मुलींवर अत्याचार झाले,बेरोजगारी व महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे.तर दुसरीकडे केवळ विकासाच्या पोकळ थापा देऊन सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनविण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत असेही आमदार विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले. 

          या मनुवादी विचाराच्या सरकारकडून दलीत,ओबीसी,आदिवासी समाजाचे आरक्षण संपविण्याचा कट सुरू आहे.आपण सर्वांनी देशाच्या पवित्र संविधानाचे रक्षण करण्यासाठी व लोकशाही टिकविण्यासाठी काँग्रेसला मतदान करून देश वाचविण्याच्या लढ्यात सहभागी व्हावे असी कळकळीची विनंती आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी भिसी येथील मतदारांना केली..

                देशात सर्व योजना काँग्रेस काळात सुरू झाल्या.आयत्या बिळावरचे हे लुटारू सत्ताधारी देश व राज्याला कर्जबाजारी करून गुलाम करण्याच्या वाटेवर आहेत. 

        चिमूर विधानसभा क्षेत्र अश्याच धर्माध शक्तीच्या हातात गेला असून भिसी येथे १८० कोटींच्या विकासाची थापा मारणारे येथील ठेकेदार आमदाराने विकासाच्या नावावर १३० गाळे पाडून अनेकांना बेरोजगार करून केवळ ३० गाळे बांधण्याचे व अनेकांवर उपासमारी आणण्याचे काम केले.

          या ठिकाणी नगर पंचायत दर्जा प्राप्त होताच कृषी योजनांचा लाभ बंद झाला,रोजगार हमी योजनेची कामे बंद होऊन मजुरांची भटकंती झाली,असला विकास काही कामाचा नसून नागरिकांना देशोधडीला लावण्याचे काम येथे सुरू आहे. 

             आपण सर्वांनी जागृत राहून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार निवडून देऊन भिसी शहराच्या विकासाची दारे उघडावी असे आवाहन आमदार विजयभाऊ वडेट्टीवार,आमदार अभिजित वंजारी व इतर मान्यवरांनी केले.

          बेताल वक्तव्यातून सत्ताधारी मंत्री कापून काढण्याची,पैशाचा पाऊस पाडण्याची भाषा वापरत असून त्यांना सत्तेचा गर्व चढला आहे,अश्यांना सत्तेतून खाली खेचा असे आवाहन पदवीधर शिक्षक आमदार अभिजित वंजारी यांनी यावेळी केले.

          या प्रचार सभेला माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार,पदवीधर शिक्षक आमदार अँड.अभिजीत वंजारी,काँग्रेसचे ओबीसी सेल प्रदेश संघटक धनराज मुंगले,काँग्रेसचे चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतीश वारजूरकर,प्रसिद्ध लावणी कलावंत गौतमी पाटील,सुमन मुंगले,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आकाश पाटील,नगरसेवक पदाचे उमेदवार,तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.