आरमोरी वाहतुक पोलीसांची वसुली धाकावर?…

रुपेश बारापात्रे

आरमोरी शहर प्रतिनिधी

आरमोरी :- 

   गडचीरोली जील्ह्यातंर्गत आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदी घाटाजवळील रस्त्यावर दुचाकी,चारचाकी वाहनधारकांना अडवून चालानचा धाक दाखवीत वाहतूक पोलिस वसुली करीत असल्याचे वाहन धारकाकडुन सांगण्यात येत आहे.

         वाहतुक पोलीसांच्या मोहीमे मुळे वाहन धारकांची कुचबंना होत आहे.सध्या लग्नसराईची धुम चालु आहे,दररोज हजारो वाहनधारक आरमोरी तालुक्यात येत असतात.

        पण,आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाहतुक पोलीस चालान न फाडता वसुली करीत असल्याची खात्रीपुर्वक माहीती आहे.

        त्यामुळे या वसुलीची पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन संबधितांवर कार्यवाही करावी अशी रस्ता मार्गक्रमण करणाऱ्या वाहतुक धारकांची खुली मागणी आहे.