संतांचे वास्तव असणाऱ्या सिध्दबेटाच्या विकासकामांचा शुभारंभ…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई या संत भावंडाचे वास्तव्य असलेल्या सिद्धबेटात सांप्रदायिक साधना करण्यासाठी, पवित्र भूमीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मंडळी आवर्जुन येथे येतात. नामदेवांसह श्री ज्ञानेश्वर महाराज तीर्थाटन करून आल्यानंतर याच सिद्धबेटात राहिले होते. पण गेली अनेक वर्षे सिध्दबेटाची अवस्था फार बिकट झाली होती. चला एक पाऊल सिध्दबेटाकडे या मोहिमेमुळे भाविकांची वाट सिध्दबेटाकडे वळाली आहे.

          आळंदी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे हे आळंदीत रुजू झाल्यापासून सिध्दबेटाचे पावित्र्य जोपासण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करत आहेत त्याच अनुषंगाने सिध्दबेटात सद्य परिस्थितीत एक बाजू वगळता चालण्याकरिता दगडी ट्रक अस्तित्वात आहे, दुसऱ्या बाजूला पावसाळ्यात याठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले असते त्यामुळे भाविकांना व नागरिकांना चालण्यासाठी अडचण निर्माण होते ही अडचण दूर व्हावी याअनुषंगाने आळंदी नगरपरिषदेच्या पुढाकाराने आय.ए.एच.व्ही. या संस्थेने सीएसआर निधीतून दगडी वाॅकींग ट्रक विकास करण्यासाठी सहकार्य केले आहे, या सिध्दबेटातील विकासकामांचा शुभारंभ मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

          याप्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते डि.डि.भोसले, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, सागर भोसले, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, शिरीष कारेकर, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, डॉ.सुनील वाघमारे, किरण नरके, अरुण बडगुजर तसेच आय.ए.एच.व्ही. संस्थेचे पदाधिकारी, नगरपरीषदेचे अधिकारी, कर्मचारी, आळंदीकर ग्रामस्थ, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.