उन्हाळी फसलचे धान कमी किंमतीत व्यापाऱ्यांना विकू नये..

 

     राजेंद्र रामटेके

तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

     उन्हाळी धान खरेदी संदर्भात कुरखेडा येथील उप प्रादेशिक कार्यालयात जाऊन व्यवस्थापक श्री बावने यांच्या सोबत तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष जयंत पाटील हरडे व पुंडलिक नीपाने यांनी सविस्तर चर्चा केली.

        १ जून रोज गुरवार पर्यंत तालुक्यातील धान खरेदी केंद्र सुरु करन्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली.

       तसेच प्रादेशिक व्यवस्थापक श्री कोटलावार यांच्याशी फोन वर धान खरेदी बाबत चर्चा करन्यात आली.प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार यांनी १ जून पासून तालुक्यातील सर्व शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे आस्वासन दीले.

        उन्हाळी धान खरेदी केंद्र लवकरच सुरु होत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी उन्हाळी फसलचे धान कमी कीमतीत व्यापाऱ्यांना वीकु नये असे आवाहन तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष जयंत पाटील हरडे,तालुका कीसान सेलचे अध्यक्ष पुंडलिक नीपाने यांनी कले आहे.