आयटक चा आरमोरीत तालुकास्तरीय मेळावा… आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांचे जानेवारी पासूनचे थकीत वाढीव मानधन त्वरित द्या – डॉ. कोपुलवार 

ऋषी सहारे

 संपादक

आरमोरी :–आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना तालुका शाखा आरमोरी च्या वतीने आशा व गटप्रवर्तकांचा तालुका स्तरीय मेळावा कॉ विनोद झोडगे राज्य सचिव आयटक यांच्या अधक्षतेखाली स्थानिक तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला.

       यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाकप चे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. कॉ.महेश कोपुलवार, डॉ.शिलू चीमुरकर,आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या अध्यक्ष कॉ.संगीता मेश्राम, सचिव कॉ .अश्विनी दोनाडकर, तीलोतमा भानारकर,डायना जनबंधू शिल्पा वाघरे आदी मान्यवर उपस्थित होते.

          मेळाव्याची सुरुवात स्त्रि शिक्षणाची जनक सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून करण्यात आली.यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध स्थानिक मागण्या विषही चर्चा केली ज्यामधे जानेवारी ते एप्रिल 2023 चे वाढीव मानधन त्वरित देण्यात यावे.

        सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या , केंद्रीय अर्थ संकल्पात पुरवणी बजेट मध्ये तरतूद करून आशा वर्कर ला 18000 /-रु .व गटप्रवर्तक महिलांना दरमहा रूपये २५०००/– हजार किमान वेतन द्या,कंत्राटी कर्मचारी यांचे प्रमाने सुसूत्रीकरणात गटप्रवर्तकांचा समावेश करा व त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्या प्रमाने वेतन व भत्ते द्या , आरोग्य खात्यातील रीक्त पदावर ५० % जागा पात्रतेनुसार आशा व गटप्रवर्तक महिला मधुन भरा , आरोग्य वर्धिनी केंद्रातील ऑगस्ट 2022 पासूनचे थकीत मानधन व नियमित मिळणारा थकीत मोबदला /मानधन ताबडतोब अदा करा व या पुढे नियमीत दरमहा ५ तारखेच्या आत माणधन अदा करा .दर महिन्याला वेतन चिटी देण्यात यावे,संघटने सोबत दर महिन्याला तालुका व जिल्हा स्तरावर समस्या निवारण बैठक घेण्यात यावी.

       आयुष्मान भारत योजने अंतर्गत त्यांनी केलेल्या त्या कामाचा मोबदला ग्राम पंचायत मार्फत त्वरित अदा करा. LBW (कमी वजनाची बालके)यांचा मोबदला त्वरित जमा करून,यापुढे पूर्वी प्रमाणे या कामाचा मोबदला सुरू ठेवण्यात यावा.आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी यांना वीणा मोबदला कोणतेही कामे सांगू नये. जिल्हा रुग्णालय येथे आशा निवास त्वरित तयार करण्यात यावा.आशा व गट प्रवर्तक यांचा एप्रिल पासूनचा थकीत मोबदला त्वरित देण्यात यावा. आशा व गट प्रवर्तक मधून आरोग्य विभागात 50 टक्के जागांची भरती करा त्यांना पगारी सुट्टी,किरकोळ रजा,बाळंत पणाच्या पगारी रजा लागु करा.

        आशा व गट प्रवर्तक यांच्या कुटुंबातील सर्व सदक्स्य यांची आरोग्य तपासणी शासकीय सेवेतून मोफत करण्यात यावी. आशा गट प्रवर्तक यांना सामाजिक सुरक्षा लागू करा.राज्य सरकारने आरोग्य अभियानातील कर्मचारी प्रमाणे आशा व गट प्रवर्तक यांना वेतन सुसुत्री करणा मध्ये सामाविष्ट करा .प्रसूती करिता आशा गरोधर मातेसह असल्यास ती प्रसूती शाशकिय किंवा प्रायव्हेट दवाखान्यात झाली तरि आशा ला प्रसुतीपूर्व व प्रसूती पश्यात सर्व मोबदला अदा करण्यात यावा.पालवी कार्यक्रम अंतर्गत माहिती भरताना अनेक अडचणी येतात तसेच आशा वर्कला सुधा यामधे बचू जन्मा पासून नियमित भेटी द्यावा लागतात तेव्हा त्या कामाचा मोबदला अदा करण्यात यावा या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्या विषही यावेळी चर्चा करण्यात आल्या.

        यावेळी डॉ.महेश कोपुलवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपल्या हक्कासाठी संघटना मजबूत करून पुढील लढा तीव्र करण्यासाठी सज्ज व्हा ! कारण हे केंद्र आणि राज्य सरकार कामगार किसान विरोधी असून भांडवलदार यांच्या हिताचे काम करत सरकारी मालमत्ता खाजगी घशात टाकण्याचा सपाटा लावलेला आहे तसेच प्रचंड महागाई वाढत असताना त्यावर अंकुश लावण्यात हे सरकार अपयशी झाल्याचे सांगत येत्या 2024 मध्ये भाजप हटाव ,देश बचाव, संविधान बचाव किसान कामगार बचाव करण्यासाठी सर्व कामगारांनी तयारीला लागण्याचे आवाहन केले.

           डॉ.चिमुरकर मॅडम यांनी आशा वर्कर यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना किमान वेतन,सामाजिक सुरक्षा लागू करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच आपल्या पाठीशी मी ठामपणे उभी राहणार असल्याचे प्रतिपादन केले.

              मेळाव्याचे संचालन कविता इंदुरकर,प्रास्ताविक संगीता मेश्राम तर आभार रेखा भोयर यांनी मानले. यावेळी तालुक्यातील शेकडो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते. 

        स्थानिक मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्रआंदोलनाचा इशारा आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे.