आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन.. — कालिमाता मंदिर परिसरात होणार भव्य सभा मंडप..

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

मुलचेरा:- तालुक्यातील विवेकानंदपुर येथे आ धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

       विवेकानंदपुर येथील कालीमाता मंदिर परिसरात सभा मंडप बांधकाम करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती.अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी सदर सभा मंडप बांधकामासाठी निधी उपलब्ध करून करून देत नुकतेच सदर कामाचे भूमिपूजन केले.

         काली मंदिर परिसरात सभा मंडप बांधकाम होणार असल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार आत्राम यांचे आभार मानले.भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर विश्वास,सरपंच भावना मिस्त्री, माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार, राकॉचे ज्येष्ठ कार्यकर्ते रंजीत मंडल,तालुका कार्यकारी मनोज बंडावार,शहर अध्यक्ष मनोज कर्मकार,निखिल इज्जतदार, माजी नगराध्यक्ष सुभाष आत्राम,नगरसेविका सपना मडावी,नगरसेविका मनीषा गेडाम,नगरसेविका मंगला आलाम,विष्णू रॉय,मारोती पल्लो आदी उपस्थित होते.