संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी योगी निरंजननाथ…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा प्रमुखपदी योगी निरंजन नाथ यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवार दि. २९ रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्वस्त मंडळाची मासिक बैठक संपन्न झाली.

          या बैठकीत सन २०२४ च्या पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पालखी सोहळाप्रमुख म्हणून संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

        यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ उपस्थित होते, अशी माहिती देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.