निलेश लंके यांनी दिला आमदारकीचा राजीनामा…

दिनेश कुऱ्हाडे

    उपसंपादक

पुणे : पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज (29 मार्च) अहमदनगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

          लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघातून निलेश लंके निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाला राम राम करत पुन्हा राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षात घरवापसी करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

           तसेच 15 दिवसांपूर्वीच निलेश लंके यांनी त्यांच्या “मी अनुभवलेला कोविड” या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते केले होते. यावेळी त्यांनी आज माझा कोणताही पक्षप्रवेश नाही, असे स्पष्ट करताना मी शरद पवारांच्या विचारधारेचाच असल्याचे म्हटले होते. यानंतर आता त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत शरद पवार पक्षात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.