कुरखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज याची तिथिप्रमाणे 394 वी जयंती थाटात साजरी… 

     राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

 २८/०३/२०२४गुरुवारला राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे 394 वी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, उप जिल्हा प्रमुख डाॅ.महेंद्र मोहबंसी यांचे उपस्थितीत तालुका प्रमुख आशिष काळे यांचे हस्ते माल्यार्पन करून विधीवत पुजन करण्यात आले.

            सायंकाळी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आभासी जिवंत देखावा व प्रतीमेची ढोलं ताशाचे गजरात वाजत गाजत असंख्य महिला पुरुष शिवसैनिकांच्या उपस्थितीत फेरी काढण्यात आली.

         यावेळी युवती सेना जिल्हा अधिकारी उमा चंदेल,,नगराध्यक्षा सौ अनिता बोरकर, न.प.चे सभापती अशोक कंगाले,नगरसेवक जयु चंदेल, नगरसेविका हेमलता नंदेश्वर, कांताताई मठ्ठे सह शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष शारदा गाथाडे, शहर प्रतिनिधी अश्विनी पिंपळकर,अनिता ताई चेपटे,सौ.तिरगम, गजु भोयर,अनिल ऊईके,पुरुषोत्तम तिरगम, लोमेश कोटांगले, गुणवंत दडमल,सुभाष मडावी, सोहन बादशहा, प्रशांत ठलाल,हेमंत पात्रे,निखील वाघाडे, अमीत पिपरे, अजु सय्यद, देवेंद्र मेश्राम, कोवीत वैरागडे सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. आंजनटोला येथील गोंडी रेला न्रुत्याने लोकांचे पारडे फिटले.