रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी… 

     राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

          राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती(तिथी प्रमाणे) झुरे मोहल्ला(महात्मा गांधीजी पुतळा) मौजा कुरुड येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

        यावेळी माजी जी. प. स.दिगंबरजी मेश्राम, अविनाशजी गेडाम शिवसेना उपजिल्हा प्रमुख, उबाठा, विलास ठाकरे उपतालुकाप्रमुख उबाठा, विठ्ठलजी ढोरे माजी तालुकाप्रमुख, दादाजी भररे माजी ग्रा. प.स. रघुनाथ जी खरकाटे माजी पोलिस पाटील,मडावी जी पोलिस पाटील,विजय जी कुंभलवार,जयराम जी झुरे,रामचंद्र जी ठाकरे,प्रल्हाद जी मेश्राम(नाट्य निर्माता),पुरुषोत्तम जी भजने,हरिश्चंद्र जी झुरे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

           मान्यवरांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचं कार्य किती महान होते आणि आजच्या घडीला ते समाज हित साठी कशाप्रकारे महत्त्वाचे आहे हे विषद केले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास ठाकरे यांनी केले तसेच संचालन आणि आभार प्रदर्शन विठ्ठल जी ढोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास ठाकरे,कुणाल ठाकरे तसेच विठ्ठल ढोरे यांनी विशेष मेहनत घेतली.