“विदर्भ महाविद्यालय लाखनी येथे मराठी राज्यभाषा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा”…

  चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा

        “विदर्भ महाविद्यालय लाखनी येथे मराठी राज्यभाषा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.

        याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाजूक राम बनकर,डॉ. अमित गायधनी,डॉ. नीलिमा कापसे मंचावर उपस्थित होते.

         या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.मंजुषा गायधने हिने केले.तर डॉ. अमित गांधी यांनी मराठी भाषेचे महत्व सांगून मातृभाषेतूनच आपल्याला लवकर ज्ञान प्राप्त करता येतेअसे सांगितले तर मराठी ही आपली भाषा व आपली मातृभाषा आहे तिचा विकास आणि तिचे महत्त्व टिकवणे हे आपल्या मराठी माणसाच्या हातातच आहे.त्यासाठी त्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे असे विचार मराठी विभाग प्रमुख डॉ. निलिमा कापसे यांनी मांडले.

          आपली मराठी भाषा ही समृद्ध आहे.त्यातली विविधता आपण समजून घेतली पाहिजे असे विचार प्राचार्य डॉ.  नाजूक बनकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले.

         तसेच प्रा.दामोदर रामटेके यांनीही मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे संचालन कु.सिमरन वंजारी हिने केले तर आभार कु.प्रज्वल्ली रामटेके ह्या विद्यार्थिनींनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.