अष्टविनायक युवा गणेश मंडळाला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची सदिच्छा भेट…

उमेश कांबळे

ता प्र भद्रावती 

         गणेशोत्सव हा सामाजिक एकता व आनंदाचे भक्तीमय पर्व निर्माण करणारा उत्सव आहे असे प्रतिपादन वरोरा भद्रावती क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.

        भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील गवराळा वॉर्ड येथील अष्टविनायक युवा गणेश मंडळाला त्यांनी भेट देऊन सन्मानजनक देणगी गणेशाच्या चरणी अर्पण केली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा कुचनकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी वॉर्डातील महिलांनी वॉर्डातील विविध समस्या वर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी विनंती केली.

         याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष मयूर कुटेमाटे, सचिव अखिल शेख, गोलू विधाते, गुणवंत धाबेकर,रुपेश मडावी ,चेतन राखूडे,ओम चिंचोलकर,शंकर सातपुते तसेच किशोर ठाकरी, व जगन्नाथ मंडळाचे सदस्य तसेच शहर काँग्रेस व तालुका कार्यकारणी चे पदाधिकारी व मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.