ब्रेकिंग न्युज…. ट्रक व ट्रेलर ची धडक… — चालक जागीच ठार…

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली –

एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने व ट्रेलर ने धडक दिल्याने ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजता चे दरम्यान घडली

            आष्टी कडून अन्नधान्य वितरण करणारे ट्रक क्रं एम एच ३४ ए व्ही ०९९८ या वाहनाने चामोर्शी कडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रेलर क्रं एम एच ४० सी एम २८८५ ला जोरदार धडक दिल्याने ट्रक चालक जागीच ठार झाले मृतक ट्रक चालक नामे मयूर संतोष अलोणे वय २३ रा सोमनपल्ली ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे नाव आहे.

        घटनेची माहिती आष्टी पोलीस स्टेशन ला मिळताच पोलिस निरीक्षक कुंदन गावडे व सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतक याला आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. अधिक तपास आष्टी पोलीस करीत आहेत.